नेहरू युवा केंद्राच्यावतीने जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL


नांदेड|
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्यावतीने दरवर्षी युवा विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संलग्नित युवा मंडळासाठी पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. इच्छुक मंडळानी 15 डिसेंबर 2022 पर्यंत विहित नमून्यात  नेहरू युवा केंद्र] राज निवास घर नं.21 मालेगाव रोड जैन मंदिर समोर, शिवराय नगर तरोडा (खु ) नांदेड येथे अर्ज सादर करावेत. 

दिनांक 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षात युवा मंडळाने केलेल्या युवा विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्र नांदेड कार्यालयातर्फे आरोग्य शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा, विविध शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता, पर्यावरण, युवा आदान प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय एकता कार्यक्रम, महिला सबलीकरण, स्वयंरोजगार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन, सामाजिक कार्यक्रम इत्यादी विविध क्षेत्रात कार्य केलेल्या संलग्नित युवा मंडळाना हा पुरस्कार देण्यात येतो. 

पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये धनादेश व प्रशस्तीपत्रक असे आहे. जिल्ह्यातील संलग्नित ग्रामीण भागातील युवा मंडळ, महिला मंडळ, क्रीडा मंडळ, सेवाभावी संस्था, व्यायामशाळांनी अर्जाबरोबर मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र, घटना, आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा अहवाल, लेखा परीक्षणाचा अहवाल व ग्रामपंचायत कार्यालयाच्या शिफारशीसह सर्व मंडळानी विहित नमुन्यामध्ये अर्ज करावे. अर्जाचा नमुना नेहरू युवा केंद्र या कार्यालयात उपलब्ध आहे. या योजनचा लाभ जास्तीतजास्त युवा मंडळानी घ्यावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी युवा केंद्र अधिकारी चंदा रावळकर  यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी