कंचली जंगलात नेऊन पीडितेवर अत्याचार करणाऱ्या संशयितास पोलिसांनी घेतलं ताब्यात -NNL


नांदेड|
जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या किनवट तालुक्यातील शिवणी येथील एका १५ वर्षीय मुलीला कंचली जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना दि.२७ नोव्हेंबर रोजी घडली असून, याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, किनवट तालुक्यातील मौजे शिवणी येथे गावातील दोन तरुण कामाच्या निमित्ताने दि.२७ नोव्हेंबरला पीडितेच्या घरी आले हाेते. त्यांनी पीडितेच्या वडिलांना आवाज दिला. पण ते जेवण करत असल्याने पीडितेने काय काम आहे, अशी विचारपूस केली. त्यांनी काहीही उत्तर न देता पीडितेला बळजबरी दुचाकीवर बसवले. यावेळी पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांनी तिला कंचली जंगलात सोबत नेले. जंगलात गेल्यानंतर दोघांपैकी एक तरुण दुचाकी घेऊन गावाकडे परतला. पीडिता व दुसरा तरुण जंगलातच होते. त्या तरुणाने रात्रभर पीडितेवर अत्याचार केला.

दरम्यान, पीडितेचे कुटुंबीय मुलीचा शोध घेत होते. पण तिचा शोध लागत नव्हता. दि.२८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पीडितेला शोधण्यासाठी कुटुंबातील सदस्य जंगलात आले. बराच वेळ शोध घेत असताना कुटुंबीयांना तिचा आवाज आला. त्यांनी तिला धीर दिला त्यानंतर पीडितेने घडलेला प्रसंग तिने आई-वडिलांना सांगितला. त्यांनतर दि.२९ नोव्हेंबर रोजी पीडितेला सोबत घेऊन आई-वडिलांनी इस्लापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली, आणि युवकावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी राजरतन ऊर्फ बाळ्या व्यंकटी कांबळे (२२) व त्याला मदत करणारा संशयित आरोपी विकास श्रावण अंबेकर त्याला ताब्यात घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी