हिमायतनगर। आज तालुक्यातील मौजे मंगरुळ येथिल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे "संविधान दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाने या देशातील समस्त जनतेला एका रेषेमध्ये आणले. सर्वांना समान न्याय व अधिकार दिले. भारतीय संविधाना मुळेच आज आपल्या देशामध्ये एकात्मता टिकून आहे. भारतीय संविधानातील उदात्त मूल्य स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांची शिकवण मुलांना शालेय जीवनापासूनच दिली पाहिजे असे प्रतिपादन उपसरपंच संतोष आंबेकर यांनी यावेळी केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ कुंजरवाड, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पाईकराव, बालाजी पावडे, हिंगाडे ताई यांची प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. खिराडे सर होते आणि कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.सुमेध पोपलवार सर यांनी केले याप्रसंगी शाळेतील शिक्षक फुंदे सर,पाटील सर, उपलंचवार सर,निलगिरीवार सर, व यनगुलवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.