अर्धापूर, निळकंठ मदने| बायपास रस्त्याचे काम बंद असल्याने पुर्ण वाहने शहरातून जात आहेत, सततच्या वाहतुकीमुळे शहरातील रस्त्यांत खड्डे पडले असून, सर्वत्र धुळ उडत असल्याने सर्वपक्षीय सोमवारी रस्तारोको केला,पण व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही, रस्तावरील खड्डे बुजवावे,व रस्त्यावर दिवसातून तिन वेळा पाणी टाकावे ही मागणी पुढे येत आहे.
राज्य क्र.३६१ तुळजापूर-नागपूर रस्त्याचे काम सुरू आहे, अर्धापूर बायपासचे काम बंद आहे,या बासपास रस्त्याचा जितका मावेजा मिळाला आहे,तो रस्त्याचे काम सुरू करण्यास सर्वांची संमती आहे,पण न मिळालेल्या मावेजाच्या जमीनीवर काम सुरू करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे, बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे अर्धापूर शहरातून सर्व छोटे-मोठे वाहने जात असयाने या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळ उडत आहे.
व्यापारी संघटनेच्या मागणीमुळे काही दिवस या रस्त्यावर पाणी टाकले,पण ते पाणी टाकणे बंद केले आहे पाऊस उघडला आहे. त्यामुळे धुरळा उडत आहे, खड्डे त्वरित बुजवावेत व रस्त्यावर पाणी टाकावे या मागणीसाठी सर्व पक्षीय सोमवारी सकाळी रस्ता रोको केला,पण या रस्ता रोकोकडे व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष केले. बायपास चे काम सुरू करुन शहरातील मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी करावी अशी मागणी पुढे येत आहे. नगरसेवक बाबूराव लंगडे, डॉ विशाल लंगडे, शेख साबेर,अशोक डांगे, रमेश पाटील क्षीरसागर यांची उपस्थिती होती.