जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड्स,वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद
पुणे। भारतरत्न लता मंगेशकर दीदींच्या स्वराने अजरामर झालेली, ५१ संगीतकारांनी संगीत दिलेली, ५१ अभिनेत्रीवर चित्रीत झालेली ,५१ चित्रपटातील ५१ गाणी सलग एकाच कार्यक्रमात सादर करण्याचा विक्रम पुण्यातील गायिका आरती दीक्षित यांनी केला आहे .
'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड'आणि 'जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये हा विक्रम नोंदविला गेला आहे.प्रसाद मंगल कार्यालय येथे झालेल्या या विक्रमी कार्यक्रमात वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स चे परीक्षक आमी छेडा,पंकज चंद्रात्रे, तसेच देवदत्त जोशी ,भाग्यश्री जोशी हे मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह देऊन आरती दीक्षित यांना गौरविण्यात आले.
आरती दीक्षित या 'निसर्गराजा', 'बिनाका गीतमाला', अशा विविध संकल्पनांवर आधारीत कार्यक्रम सादर करतात. गायन क्षेत्रात त्या २० वर्षे कार्यरत आहेत. अमीन सयानी यांच्यासमवेत देखील त्यांनी कार्यक्रम केले आहेत.