नांदेड। गणेश नरसिंगराव नव्हाते हे नांदेड पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर आहेत व गांव पांढरवाडी ता.मुदखेड जि.नांदेड यानी आपल्या मुलीला म्हणजे कु,अंकीता यास शिक्षणास चागंला प्रतिसाद देत तिला नेट परिक्षेत यश प्राप्त होण्यासाठी महत्वाची भुमीका घेतली व ग्रामीण भागातील मुलींच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
कु,अंकीता चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा,पांढरवाडी माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय,मुदखेड येथे ११-१२वी यशवंत महाविद्यालय, नांदेड पदवी (B.Sc.)जैवतंत्रज्ञान( Biotechnology) नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड येथून पदवीत्तर शिक्षण (M.Sc.) पर्यावरणीय विज्ञान व तंत्रज्ञान (Environmental Science & Technology) Qualified National Eligibility Test (UGC NET) & Junior Research Fellowship (JRF) पिचडी साठी फेलोशिप प्राप्त असल्याने पर्यावरणीय विज्ञान व तंत्रज्ञान विषयात पुढील संशोधन करण्याचा मानस आहे.
कु.अंकीता नव्हारे यांनी नेट मध्ये यश प्राप्त केल्याबद्दल नांदेड खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब,सौ,प्रणिताताई देवरे-चिखलीकर यानी अभिनंदन केले तर आई-वडील व कुटुंबातील व गुरुजननाच्या पाठिंब्यामुळे मि या परिक्षेत यशस्वी झाल्याची भावना कु.अंकीता हिने व्यक्त केली आहे. युजीसी नेट परीक्षा ही देशातील ५ महत्त्वाच्या परीक्षांपैकी महत्त्वाची आहे, यामधून विविध विषयांचे प्राध्यापक पदासाठी तसेच संशोधना साठी निवड केली जाते.