नांदेड। वाडी पाडा तांड्या पर्यंत शेवटच्या घटका पर्यंत केंद्र सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना पोहचत आहेत.खेमा तांडा (बिजेवाडी) येथील बंजारा समाजातील महिलांक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याना विविध योजनांचा आम्हाला लाभ मिळाला त्या बद्दल पत्र लिहून धन्यवाद मानणारे पत्र लिहिले.भाजपा प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या मार्गदर्शना खाली या ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्त पत्र लिहिले.स्वतः प्राणिताताई यांनी तांड्यावर जाऊन रहिवाशी महिला पुरुष यांच्याशी संवाद साधला.
भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांचा मागील आठ वर्षात जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात मोठा संपर्क झाला आहे त्या सतत पक्ष संघटन , मोदी सरकारच्या विविध योजना व पक्षाने राबविले विविध उपक्रम अभियान यात त्याचा सक्रिय सहभाग असतो शहरी भागासह ग्रामीण भागात तालुका पातळीवर त्यांचे नेटवर्क मोठे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाचा विकास होतो आहे विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहे याबद्दल विविध योजनेचे लाभार्थी यांनी स्वतः पत्र लिहून पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे आभार मानले. धन्यवाद मोदीजी हा गेल्या आठ वर्षा पासून पक्षाच्या पदाधिकारी व संघटनस्तरावर उपक्रम राबविला जातो आहे.
खेमातांडा (बीजेवाडी) येथील विविध योजना लाभार्थी ग्रामस्थ व भाजपा तालुकाध्यक्ष कंधारचे भगवान राठोड, बिजेवाडी सरपंच प्रतिनिधी लक्ष्मणराव जाधव, भाजपा तालुकाउपाध्यक्ष गोविंद गुरुजी शिंदे, शहर चिटणीस मधुकर डांगे, राजहंस शहापुरे प्राचार्य शंतनु कैलाशे , बालाजी तोटावाड, प्रकाश घोरबांड, विजय गायकवाड, बीजेवाडीचे उपसरपंच राजू डांगे, सुरेश राठोड, रंजना जाधव, उद्धव डांगे, कैलास आदमपुरे, रमेश जाधव,विश्वनाथ पवार, देवानंद डांगे, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.या भागातील गावांना भेटी देऊन तेथील लोकांच्या अडीअडचणी प्राणिताताई यांनी जाणून घेतल्या