नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे एकमेकांना ओव्हरटेक करत पालकमंत्र्यांच्या भेटीला -NNL


लोहा।
लोहा नगरपालिकेच्या निवडणूकीला अवघे अकरा महिन्याचा काळ बाकी आहे. पालिकेत भाजपचे नगराध्यक्ष व निर्विवाद सत्ता असतानाही पक्षातील नगरसेवकात एकाचा पायपोस एकाला नाही ..या सगळया घडामोडीत जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीश महाजन नांदेडला पहिल्यांदाच आले. त्यांना लोहा नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व   उपनगराध्यक्ष हे  दत्तराव वाले हे स्वतंत्र भेटले व त्यांनी सत्कार केला. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष हे एकमेकांना  ओव्हरटेक तर करीत नाहीत ना(?) यांची जोरकस राजकीय  चर्चा सुरू आहे.

राज्यात संतांतर झाले आणि लोह्यात काँग्रेस प्रवेशाच्या आवाईला ब्रेक  बसला. पालिकेत भाजपाच्या नगराध्यक्ष -उपाध्यक्ष व नगरसेवक यांच्यात एकवाक्यता नाही. राज्यात सत्तांतर झाले आणि बरेच पाणी पुला खालून वाहून गेले. जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन यांच्या पहिलाच नांदेड दौरा डीपीडीसी ची पहिलीच बैठक होती. खा चिखलीकर यांच्या साई -सुभाष येथे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली व शहराच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी करणारे निवेदन दिले यावेळी खा. प्रतापराव पाटील यांनी पालकमंत्री याना नगर पालिकेला निधी बाबत सांगितले.


डीपीडीसीच्या बैठकीनंतर लोह्याचे उपनगराध्यक्ष दत्तराव वाले यांनी पालकमंत्री महाजन यांच्या सत्कार केला.शहराच्या विविध विकास कामाना निधी उपलब्ध करून देण्या बाबत पालकमंत्री याना विनंती केली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष हे एकेकाळी एकमेकांचे जिवलग मित्र होते आजही आहेत. पण दोघा मित्रांत समन्वय कमी झाला पण दोघेही एकाच शाळेतले त्यामुळे एकही संधी सोडत नाहीत हे विशेष .नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी व उपनगराध्यक्ष दता वाले हे एकमेकांना  ओव्हरटेक ते  करीत  नाहीत ना (?)  त्याची शहरात जोरकस चर्चा सुरू आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी