नांदेड। उत्पन्नाच्या तुलनेत 45 टक्के अधिक आपसंपदा आढळून आल्या प्रकरणे सेवानिवृत्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी, वय 62 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, तत्कालीन अपर आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका, नांदेड त्यांची पत्नी व मुलास लाज लुप्त प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतली असून याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 आणि कलम 109 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, न्यायाधीश महोदय यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
लोकसेवक रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी, वय 62 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, तत्कालीन अपर आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका, नांदेड. यांचे मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली आहे. सदर उघड चौकशीअंती त्यांनी त्यांचे लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना कायदेशीररित्या प्राप्त असलेल्या आर्थिक उत्पन्नाच्या तुलनेत त्यांच्याकडे आढळून आलेल्या अधिक मालमत्तेबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यांनी त्यांचे ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत 28,72,660/- रु. (ज्ञात उत्पन्नाचे तुलनेत 45%) ची विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित केल्याचे निष्पन्न झाले आहे.
उत्पन्न संपादित करण्यासाठी त्यांची पत्नी जयश्री यांनी सदर मालमत्ता आपल्या नावावर बाळगून अपप्रेरणा दिली व मुलगा प्रथमेश यांनी सदर मालमत्ता ताब्यात बाळगुन त्यावर व्यवसाय करून प्रोत्साहन दिले आहे. म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया चालु असुन सर्व आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. डॉ राजकुमार शिंदे पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड, धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नांदेड, राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अशोक इप्पर पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांनी केलं.
याबाबत श्री राजेंद्र पाटील, पोलीस उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड. यांच्या तक्रारीवरून वजिराबाद , नांदेड येथे आरोपी 1. श्री रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी, वय 62 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, तत्कालीन अपर आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका, नांदेड. 2. श्रीमती जयश्री रामनारायण गगराणी, वय 57 वर्षे, व्यवसाय गृहिणी/बुटीक. 3. श्री प्रथमेश रामनारायण गगराणी, वय 34 वर्षे, व्यवसाय व्यापार, सर्व रा. शारदानगर नांदेड यां तिघांवर गु.र.नं. 387/2022 कलम 13(1)(ई) सह 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 आणि कलम 109 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्य काळामध्ये भ्रष्टाचार करून अपसंपदा धारण केली असेल, किंव्हा शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड मोबाईल क्रमांक 9623999944 पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड मोबाईल क्रमांक - 7350197197 कार्यालय दुरध्वनी - 02262-253512 टोल फ्री क्रमांक-1064 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.