उस्माननगर, माणिक भिसे। दरवर्षा प्रमाणे याही वर्षी उस्माननगर ता.कंधार येथील दत्तमंदिर देवस्थान येथे श्री.दत्तनाम सप्ताह व दत्तप्रगट सोहळा श्री.१०८ कैवल्यवासी श्री.गंभीरबन महंत महाराज कोलंबी यांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित करण्यात आला आहे.व श्री.गुरूवर्य संत शंकरबन महाराज गुरु अम्रतबन महाराज मठ संस्थान ईसाद ( उस्माननगर ,मोठी लाठी ) यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री. संत अवधूतबन महाराज उस्माननगर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ डिसेंबर २०२२ ते ८ डिसेंबर २०२२ रोजी दरम्यान सप्ताहाचे भक्तीमय वातावरणात पार पडणार असून ७ डिसेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
दत्तनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी ७ ते ८ बाळक्रिडा ग्रंथांचे पारायण , व त्यानंतर १० ते १२ वा.च्या दरम्यान महापुजा , दत्तभक्त महापुजेची मांडणी करणारे भक्त नागेश गणेशराव पा.घोरबांड , रमेश जगन्नाथ पा.घोरबांड , यांच्या हस्ते ,. दुपारी २ ते ४ वा.दरम्यान पोथी,वाचक :- श्री.सदाशिव महाराज मठपती , मारोती पाटील घोरबांड,तर सुचक :- संजय रतन पाटील घोरबांड, शिवाजी विठोबा पा.घोरबांड ,हे कार्य करणार आहेत.सायंकाळी ६ ते ९ महापुजा व रात्री किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहातील नामवंत विनोदी व हास्य किर्तनकार म्हणून दि.१ डिसेंबर २०२३ रोजी द.भ.पा. कृष्णा महाराज राजुरकर ,दि.२ डिसेंबर रोजी द.भ.पा. मन्मथ अप्पा डांगे गुरुजी उस्माननगर ,दि.३ डिसेंबर रोजी द.भ.पा. शामसुंदर गिरी महाराज आष्टी , दि.४ डिसेंबर रोजी द.भ.पा. साईनाथ महाराज बळीरामपूरकर , दि.५ डिसेंबर रोजी द.भ.पा. चंद्रकांत महाराज लाठकर , दि.६ डिसेंबर रोजी द.भ.पा. आनंदबन महाराज तुप्पा , यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.तर दि. ७ डिसेंबर रोज बुधवारी दुपारी( बारा) १२ वाजता ( दत्तप्रगट) दत्त जन्म उत्सव दिन सोहळा होईल.त्यानंतर ठिक दोन वाजता सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
याच दिवशी रात्रीला श्री.श्री.१०८ महंत यदुबन महाराज यांचे आगमन होणार असून त्यांचे स्वागत टाळमृदंगाच्या निनादात होईल.दि.८ डिसेंबर रोज गुरूवारी सकाळी ६ वा. काकडा आरती होईल ,व पालखी मिरवणूक सोहळा गावातील प्रमुख मार्गाने भजनी व ढोलताशांच्या निनादात निघून दुपारी मंदीरात पोहचेल. बारा वाजता दहीहंडीचा काला उत्सव श्री. संत गुरुवर्य शंकरबन महाराज यांच्या सान्निध्यात व हास्ते होईल.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी (दत्त प्रगट) दत्त जन्म उत्सव सोहळ्यास व दत्तनाम सप्ताहातील किर्तनाचा , महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री. अवधूतबन गुरू शंकरबन महाराज मठ संस्थान मोठीं लाठी उस्माननगर व समस्त गांवकरी मंडळी यांनी आवाहन केले आहे.