नविन नांदेड। नांदेड तालुक्यातील भायेगाव येथील माझं गाव आदर्श गाव या अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या कायापालट झाला असून रंगरंगोटी सह विविध दुरुस्ती व इतर कामे ग्रामपंचायत संरपच सौ. सविता बालाजी पाटील भायेगावकर व पदाधिकारी व सदस्य यांच्या पुढाकाराने पंधराव्या वित्त आयोग निधीतून शाळेच्या कायापालट झाला आहे.
भायेगाव येथील शाळेत विद्यार्थी संख्या 215 असुन पहिले ते आठवी पर्यंत असुन शाळेतील मुख्याध्यापक सौ.डी.के.ऊतरवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक पि.टी.घोरबाड, एम.एस.वाकोडे, डी.डी.शिंदे, सौ.मुकाडे, एस.एस.कपाटे एस.डी.यानी शाळा अंतर्गत विविध ऊपकम राबविले असून गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे.
शाळेची सुरुवात संगीतमय परिपाठाने व गुणवत्तापुर्ण प्रश्न मंजुषा सामान्य माहिती अधारे होत असते.विवीध स्पर्धा परिक्षेची पूर्वतयारी म्हणून अतिरिक्त शिक्षणाद्वारे स्पर्धा परीक्षा माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते, विज्ञानाच्यी आवड होण्यासाठी शास्त्रज्ञानाचां जयंता साजरा करण्यात येत असतात, तालुका स्तरावरील व बिट स्तरावरील वक्तृत्व व भाषण, निबंध स्पर्धा मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला आहे. अभ्यासाची आवड निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना कडुन आंनलाईन चाचणी व मनोरंजनात्मक शिक्षण दिले जाते, वेळोवेळी अभ्यासक्रम पूर्ण तयारी बाबत आई वडील यांना मार्गदर्शन करून संबंधित विद्यार्थ्यां कढुन अभ्यास सराव केला जात आहे.
या शाळेत अंतर्गत व बाह्य परिसरात ग्रामपंचायत कार्यालय संरपच सौ. सविता बालाजी पाटील भायेगावकर ,ऊपसंरपच बालाजी कोल्हे पाटील, ग्रामपंचायत सदस्य व शालेय समितीचे अध्यक्ष देवराव कोल्हे, उपाध्यक्ष भानुदास कोल्हे,ग्रामपंचायत सदस्य ऊर्मिला खोसडे,शिवाजी खोसडे,साईनाथ यन्नावार, आशा भालेराव पदाधिकारी यांच्या सहकार्याने व पुढाकाराने रंगरंगोटी व विविध ऊपकमाने शाळा परिसर कायापालट झाला आहे.