उस्माननगर येथे म.बसवेश्वर अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचा वेदांताचार्याच्या हास्ते शुभारंभ -NNL


उस्माननगर।
उस्माननगर ता. कंधार येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य स्वामींच्या हस्ते सोमवारी दि. २१ रोजी करण्यात आले.

उस्माननगर येथील बसस्थानक परिसरातील सिद्धेश्वर मंदिर च्या दक्षिण भागात राष्ट्रीय महामार्ग लगत भव्य दिव्य असे जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प भक्त मंडळींनी घेतला आहे. 

सकाळी अकरा वाजता संपन्न झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमास सिद्धेश्वर मंदिर देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव इसादकर, बाबुराव शेकापूरे गुरूजी, तु. शं. वारकड गुरूजी, बालाजी इसादकर, गंगाधर इसादकर, बसवेश्वर डांगे, बसवेश्वर वारकड, नारायण डांगे, संभाजी इसादकर, श्री. शेरेकर, ग्रामपंचायत सदस्य संजय वारकड सह वीरशैव भजनी मंडळी, समाज बांधव, भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


यावेळी जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवहार मठपती यांनी विधियुक्त मंत्रोच्चार करून भूमिपूजन संपन्न केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजनाची कुदळ मारून शुभारंभ करण्यात आला. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी