गेल्या तीन वर्षांपासून येथील शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून वंचित
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव सुना तलावाच्या पाण्यावर या भागातील शेतकऱ्यांची भिस्त आहे. परंत्तू मागील ३ वर्षांपासून शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले नसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला आहे. यंदा आहि परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तातडीने पाटबंधारे विभागाने आपल्या मार्फत शेतकऱ्यांच्या रब्बी सिँचनसाठी पाणी सोडण्यात यावी अशी मागणी वडगाव येथील शेतकरी गावकर्यांनी केली आहे.
रब्बी हंगाम 2022 -23 करीता सोडण्या संदर्भात कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे कार्यालय (दक्षिण) नांदेड तर्फे जाहिर आवाहन करण्यात आलेले पत्र ग्राम पंचायत कार्यालय, मौजे वडगांव (ज.) ता. हिमायतनगर येथे लावण्यात आले. पाटबंधारे विभागाने केलेल्या आवाहनातील शेवटच्या मुदयात त्या ठिकाणी पाणी वापर संस्थांनी सिंचनाचे नियोजन करावे असे नमुद आहे. परंतु वडगाव सुना तलाव डावा कालवा व उजवा कालवा वर पाणी वापर संस्थां स्थापन आहे. मागील तीन वर्षा पासुन बागायतदाराची पाणी मागणी असुन सुध्दा पाणी वापर संस्थेने पाणी सोडले नाही. त्यामुळे सर्व लाभधारक बागायतदार सिंचना पासुन वंचीत राहिले आहेत.
दोन्ही कालव्या वरील पाणी वाटप संस्थाचा कार्यकाळ संपला असुन, यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून त्या पाणी वाटप संस्था बरखास्त करुन आपल्या पाटबंधारे विभागामार्फत सिंचनाचे नियोजन करुन शेतकऱ्यांना सिंचना करीता पाणी सोडण्यांत यावे अशी मागणी वडगांव ज. ता.हिमायतनगर जि. नांदेड येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे कार्यालय (दक्षिण) नांदेड यांच्याकडे दि.११ नोव्हेंबर २०२२ रोजी अधिक्षक अभियंता, नांदेड पाटबंधाने विभाग दक्षिण नांदेड आणि उपविभाग अभियंता, ना.पा.वि.द.नां.भोकर यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर वडगाव ता हिमायतनगर येथील शेतकरी दत्तात्रेय हंगरगे, लक्ष्मण ताडकुले, रामचंद्र बीरकुरे, जयप्रकाश तडकुले आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तसेच येथील गावकर्यांनी तलावाच्या विविध समस्या संदर्भात खा.हेमंत पाटील यांच्याकडे मागणी केली होती, त्यांनी या मागणीला अनुसरून पाटबंधारे विभागाला पात्र देऊन हिमायतनगर तालुक्यातील वडगाव येथील सुना ब्रहद प्रकलपची दुरुस्ती करणे, तलावाची उंची वाढविणे गरजेचे आहे. दुरुस्ती नसल्यामुळे पाणी व्यवस्थापन करणे अवघड आहे, त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या १० गावच्या नागरिक शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागते आहे. तसेच हजारो हेक्टर शेती जमीन रब्बी हंगामात सिंचनापासून वंचित राहते आहे. त्यासाठी तातडीने येथील सुना तलावाची दुरुस्ती व १ मीटरने सांडव्याची उंची वाढऊन देण्याबाबत सूचित केले होते. मात्र अद्यापही पाटबंधारे विभागाने याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही, त्यामुळे आजघडीला ऐन रब्बी हंगामात शेतकरी सिंचन व पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत.