नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाचा आदर्श उपक्रम.
नांदेड/नायगांव| अल्पशा आजाराने नुकतेच आकस्मीत निधन झालेल्या पत्रकार विश्र्वंभर वन्ने यांचा उघड्यावर पडलेल्या कुटूंबाला रोजगाराचा आधार देण्यासाठी नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेत दिवंगत पत्रकारांच्या पत्नी श्रीमती अनुसया वन्ने यांना पिकोफाॅल मशीन व रोख रक्कम मदत देवून आधार देत धिर दिला. पत्रकार संघाच्या या उपक्रमा बदल वन्ने कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पत्रकार सतत उपेक्षितांना न्याय देण्यासाठी आपली लेखणी झिजवत असतो पण स्वतःवर संकट आल्यावर कोणीच त्यांच्या मदतीला येत नसल्याची शोकांतिका आहे हे लक्षात घेता मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर,विश्वस्त किरण नाईक, गजानन नाईक,शरद पाबळे,कोषाध्यक्ष विजय जोशी,प्रकाश कांबळे,जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदिप नागापूरकर,जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांतभाऊ सोनखेडकर व जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायगांव तालुका मराठी पञकार संघ "आम्हीच आमच्या साठी "ही संकल्पना राबवत आहे.त्याच माध्यमातून दिवंगत पत्रकार विश्र्वंबर वन्ने यांच्या कुटुंबाला आज एक पिकोफाॅल मशिन व रोख रक्कम मदत म्हणून जेष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार,प्रा निवृत्ती भागवत,मनोहर तेलंग सह अन्य मान्यवर पत्रकारांच्या उपस्थितीत देण्यात आले .
पत्रकार म्हटलं की धावपळीचे जिवन आले.मग एखादी सभेचे वृताकांन आसो या एखादी दुर्घटना आसो सतत तो बातमी कवर करण्यासाठी स्वतःची परवा न करता काम करत रहातो.वृतांकनामधुन कोणी समर्थक होतो तर, कोणी जिवावर उठतो हे माहीत असतांना ही पत्रकार आपली लेखणी स्वाभिमानाने अन्याविरोध झिजवत आसतो.हे सर्व करत आसताना कुंटबाकडे,स्वतःकडे कधी-कधी दुर्लक्ष होत असते.
अल्पशा आजाराने नायगांव येथील पत्रकार विश्र्वंबर वन्ने यांचे निधन झाले त्यांच्या पाश्चात्य पत्नी एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. घरातला कर्ता माणुस गेल्यावर कुटुंबावर दुःखाच्या आश्रु बरोबर जगण्याचा प्रश्न निर्माण होतो.आशा वेळेस मदतिला कोणी समोर येत नसते म्हणतात ना सुखात सर्व आणि दु:खात कोनी ही नसते हे कटु सत्य आहे.या परिवारावर कोसळलेले दुःखाचा डोंगर पहाता जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांनी मदतीचे आवाहन करताच बहुतांश पत्रकारांनी पुढाकार घेत रक्कम जमा केली.या जमा रक्कमेतुन भविष्यात वन्ने परिवाराला जगण्याचा आधार व्हावा कुटूंब स्वताःच्या पायावर उभे रहावे म्हणून पिकोफाॅल मशीन व रोख रक्कम मदत करण्यात आली
या वेळी सुर्यकांत सोनखेडकर,निवृत्ती भागवत, प्रभाकर लखपत्रेवार,तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, मनोहर तेलंग,पंडित वाघमारे, दिलीप वाघमारे,रामप्रसाद चन्नावार,गोविंद नरसीकर, लक्ष्मण बरगे,शेषराव कंधारे,गंगाधर गगांसागरे, आनंदा सुर्यवंशी,प्रकाश महिपाळे, वीरेंद्र डोंगरे,तानाजी शेळगांवकर,अंकुश गायकवाड प्रकाश कामळजकर,राजकुमार सोनकाबंळे सह वन्ने यांचे भावबंधकी ची उपस्थित होती. दरम्यान या मदतीने दिवंगत पत्रकार वन्ने यांच्या कूटूंबियांनी कृतज्ञता व्यक्त केली.भविष्यातही अडी-अडचणी आल्यास या कूटूंबियांच्या पाठीशी नायगांव तालुका मराठी पञकार संघ भक्कमपणे उभा राहिल असे अभिवचन यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सोनखेडकर यांनी दिले.