हिमायतनगर| किनवट- हिमायतनगर - भोकर राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. रस्त्याचे काम झाले असल्याने भरधाव वेगाने धावणारा एक ट्रक 33 केव्ही विद्युत पोलला धडकून उलटला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील कारला फाट्याजवळ घडली आहे.
मध्यरातरीला हिमायतनगर किनवट या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या एका ट्रकच्या स्टेरीगंची धडी तुटल्याने ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने 33 केव्हीच्या विद्युत पोलला ट्रकने जोराची धडक दिली आहे. या धडकेत ट्रक पलटी झाल्याची घटना हिमायतनगर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील कारला फाट्यापासुन काही अंतरावर दि.08 नोव्हेंबरच्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सदरील घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून, या घटनेमुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन आप्पाराव पेठ, शिवणी भागातील जवळपास 20 ते 25 गावांकार्यांना अंधारात रात्र काढावी लागली आहे. अशी माहिती कनिष्ठ अभियंता थोरात यांनी दिली आहे...अशा या दुर्दैवी घटनांमध्ये ट्रक चालक व हेल्पर सुदैवाने बाल बाल बचावले आहेत.