नांदेड। अमेरिकेच्या जगप्रसिद्ध फोर्ब्स मँगझिनने दखल घेतलेला, अनेक राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झालेल्या 'पल्याड' या मराठी चित्रपटाची महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने निवड केलेल्या पाच चित्रपटामध्ये निवड झाली आहे. गोव्यात होणार्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फिल्म बाजारमध्ये चित्रपटाची निवड करण्यात आली आहे अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच स्पेनमध्ये कँलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कमी बजेटमध्ये तयार केलेल्या चित्रपटासाठी दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांना बेस्ट दिग्दर्शकच्या अवार्ड जाहीर झालेला आहे.
दिल्ली येथे झालेल्या १२ व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल आणि मुंबई येथे झालेल्या ७ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात दिग्दर्शनासाठी प्रथम पदार्पणाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. चित्रपटाला आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऐकून सतरा ते अठरा पुरस्कार मिळाले आहेत. मिडिया पासून सोशल मिडिया पर्यंत सर्वच ठिकाणी चित्रपटावर स्तुतिसुमने उधळी जात आहेत.
या चित्रपटाची कथा अनिष्ट प्रथा परंपरा या विरुद्ध प्रकाशाकडे वाटचाल हे अभिप्रेत करणारी आहे. पल्याड चित्रपटाची निर्मिती चंद्रपूर येथील व्हिजनरी व्यावसायिक व निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाइफ आणि लावण्यप्रिया आर्टसच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे.
दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून शशांक शेंडे आणि देविका दफ्तरदार सोबत बल्लारशहा मधील बाल कलाकार रुचित निनावे तसेच नागपूरचे देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, सचिन गिरी चंद्रपूर मधील स्थानिक सायली देठे, भारत रंगारी, बबिता उइके, रवी धकाते, सुमेधा श्रीरामे, राजू आवळे आणि मुंबईमधील अभिनेते गजेश कांबळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा सुदर्शन खडांगळे यांनी लिहिली असून, सुदर्शन खडांगळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. रवींद्र शालीकराव वांढरे, गौरव कुमार वनिता पाटील, शिवशंकर रवींद्रनाथ निमजे, माया विलास निनावे, लक्ष्मण रवींद्रनाथ निमजे आणि रोशनसिंग बघेल हे चीत्रपटाचे सहनिर्माते आहेत. गीतकार प्रशांत मडपुवार आणि अरुण सांगोळे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, सॅम ए. आर., जगदीश गोमिला आणि तुषार पारगावकर यांनी स्वरसाज चढवला आहे...
अनन्या दुपारे, अवधूत गांधी, शमिका भिडे, सुस्मिरता डावलकर आणि केतन पटवर्धन यांनी आपल्या सुरेल गायनाद्वारे गीतांमधील शब्दांना अचूक न्याय दिला आहे. स्वप्नील धर्माधिकारी यांनी रंगभूषा केली असून, विकास चहारे यांनी वेशभूषा केली आहे. कला दिग्दर्शन अनिकेत परसावार यांनी केलं आहे, तर गिरीश रामटेके यांनी ध्वनी संयोजनाची बाजू सांभाळली आहे व नांदेड जिल्यातील बालाजी सादुलवार सर यांनी गावकऱ्यांची भूमिका केली आहे.
चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका आणि आजूबाजूच्या गावात २५ दिवसांमध्ये झाले आहे. चित्रपटात एकून चार गाणी असून गाणी झी म्युझिकने रिलीज केली आहेत. त्यातील उंच उंच उडू आज आणि सगुण विठ्ठल निर्गुण विठ्ठल हि दोन गाणी लोकांच्या पस्तीत उतरत आहेत. के सेरा सेरा या डीस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून येत्या ४ नोव्हेंबरला 'पल्याड' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.