भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते सह विक्रेते यांच्या सत्कार, मिठाई वाटप -NNL


नविन नांदेड।
भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त व नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता वितरक मंडळ जिल्हा नांदेडचा २३ व्या वर्धापनदिन निमित्ताने १५ आक्टोबंर रोजी सिडको येथील वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन भाजपा नगरसेविका सौ बेबीताई जनार्दन गुपीले व भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते यावेळी मिठाई वाटप व वृत्तपत्र विक्रेते पाल्याच्या सत्कार करण्यात आला.

भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त व नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या २३ व्या वर्धापनदिन निमित्ताने सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे वतीने सिडको टिनशेट सेटंर येथे १५ आक्टोबंर रोजी  दिवंगत राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करून  जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते यांच्या व वृत्तपत्र विक्रेते यांच्या सत्कार करून मिठाई वाटप करण्यात आली.


 वृत्तपत्र विक्रेते पाल्यांचा दहावी गुणवंत विद्यार्थ्यांनी आर्या लोणे व माधवी सुताडे यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार ऊपसिथीत भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे व भाजपा नगरसेविका सौ बेबीताई जनार्दन गुपीले व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर व मान्यवरांच्या उपस्थितीत  जेष्ठ विक्रेता रामनाथ दमकोडंवार, दौलतराव कदम,शेख सयोधदीन,मदन सिंह चौहान,महिला वितरक वंदना लोणे यांच्या सत्कार करून वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

ऊपसिथीत असलेल्या मान्यवरांच्या शाल श्रीफळ देऊन वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे सिडको अध्यक्ष सतिश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर, सचिव बालाजी सुताडे व महिला वितरक वंदना लोणे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी ऊपसिथीत मान्यवरांनी वर्षांचा बारामहिने उन्हाळा ,पावसाळा,हिवाळा मध्ये कबाड कष्ट करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता यांच्या गौरव करून भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, यावेळी वृत्तपत्र विक्रेते यांनी पेपर वाटप साठी असणाऱ्या सायकलीची सजावट केली होती.यावेळी वृत्तपत्र विक्रेते अनिल धांवडे, तातेराव वाघमारे,साई गोटमवार,शुभम कुंभार , गणेश कांबळे, राम धांवडे, अमोल नांदेडकर, बालाजी दमकोडंवार,यांच्या वृत्तपत्र विक्रेते ऊपसिथीत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी