हिमायतनगर। हु. ज. पा.महाविद्यालया मध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरी करण्यात आली.
हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालया मध्ये ग्रंथालय विभागाद्वारे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली .ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रम ठेवण्यात आला होता याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम म्हणून लाभल्या.त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी . के कदम यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले . त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वसंत कदम यांनी अब्दुल कलाम हे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात व त्यांच्या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथपाल श्री बोंबले राजू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आपल्या प्रास्ताविकामध्ये डॉ. ए . पी . जे अब्दुल कलाम यांच्या विषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी दररोज दोन तास वाचन केले पाहिजे असे सांगितले . शेवटी आभार प्रदर्शन डॉ . शेख शहेनाज मॅडम यांनी केले .या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .सर्वांनी ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद मोठ्या प्रमाणात घेतला.