संजय गिराम यांचे निधन -NNL


नवीन नांदेड।
नवीन नांदेडातील 'रवि' नगर, कौठा येथील रहिवासी व नांदेडच्या 'सिडको' परिसरातील 'भाजप'चे सक्रिय कार्यकर्ते संजय तथा 'शिवा' चंद्रकांत गिराम (वय-५२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ५ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा उपचारादरम्यान, शासकीय रूग्णालयात निधन झाले. 

लिंगायत-वाणी समाजातील सामाजिक कार्यकर्ते दिवंगत शिवा उर्फ संजय गिराम यांच्या पार्थिव देहावर गुरुवार दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जुना मोंढा, नांदेड येथील शनिमंदिराशेजारील रामघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक भाऊ असा परिवार आहे. निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते 'शिवा' तथा संजय गिराम यांच्या अकाली निधनाबद्दल सिडको- हडको परिसरासह 'रवि' नगर, कौठा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी