नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड यांच्या वतीने पार पडलेल्या विविध वयोगटात विजय मिळवून महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद घोटेकर महाविद्यालय उमरी या संघाने पटकावले या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य रावसाहेब शेंदारकर, प्राचार्य डॉ.रमेश कदम, अधिष्ठाता डॉ. टेंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले आज झालेला कुस्ती स्पर्धेत 74 किलो वजन गटात माधव उमाटे- गोरठेकर महाविद्यालय उमरी याने प्रथम तर नागेश पुयड- एन एस बी कॉलेज नांदेड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
79 किलो वजन गटात शंकर सूर्यवंशी गोरठेकर महाविद्यालय उमरी यांनी प्रथम तर अर्धापूरच्या शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या सुभाष कुठेने द्वितीय क्रमांक मिळवला .57 किलो वजन गटात पीपल्स कॉलेजच्या सय्यद अनवर ने प्रथम तर उमरीच्या रविकांत गडेमोडणे द्वितीय क्रमांक मिळवला .65 किलो वजन गटात पीपल्स कॉलेज नांदेड च्या सय्यद मुशरफ ने प्रथम तर यशवंत कॉलेज नांदेडच्या गणेश इंगळे ने द्वितीय क्रमांक मिळवला मुदखेडच्या श्री सूर्यवंशी ने तृतीय क्रमांक मिळवला.
सर्वाधिक पदके मिळवून उमरीच्या गोरठेकर महाविद्यालयाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले स्पर्धेचा पारितोषिक वितरण विद्यापीठ क्रीडा प्राधिकरणाचे डॉ. विक्रम कुंटूरवार प्राचार्य बी.डी .लाड प्राध्यापक डॉ.बालाजी जाधव डॉ.दिलीप भडके डॉ. भूपेंद्र सिंह मुनीम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ. अर्जुनसिंह ठाकूर, डॉ. साहेबराव मोरे डॉ. मनोज पैंजणे, डॉ. किरण येरावार ,राजू दळवी , डॉ. राजू कोंडेकर , व्ही.सी. ठाकूर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.