नविन नांदेड। सार्वजनिक दुर्गा देवी नवरात्र महोत्सव मंडळाने बसविलेल्या दुर्गा देवीचे विसर्जन ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील झरी येथील खदानित मनपाच्या वतीने जिवरक्षक दलाच्या साह्याने क्रेनने विसर्जन करण्यात आले. यावेळी मनपाचे आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या सह कर्मचारी व ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
नवरात्र महोत्सव निमित्ताने सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडळाने विधीवत पूजा करून न ऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते, नवमीला होमहवन झाल्या नंतर विजयी दशमीला मोठ्या प्रमाणात आपट्याच्यी पाने ठेवुन दर्शन घेतले. आयुक्त डॉ सुनिल लहाने, उपायुक्त सुंकेवार, राठोड,साहयक आयुक्त डॉ. रईसोधदीन, सदाशिव पंतगे,ऊपअभियंता शिवाजी बाबरे,कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे,कर निरीक्षक सुधीर बैस, राहुल सोनसळे, वसुली लिपीक व सिडको क्षेत्रीय कार्यालय चे कर्मचारी यांच्या सह स्वच्छता विभागाचे प्रमुख वसिम तडवी, स्वच्छता कर्मचारी, मुख्य कार्यालयातील विविध विभागांचे प्रमुख व कर्मचारी यांच्यी उपस्थिती होती.
यावेळी महोत्सव मंडळाचे नांदेड शहरातील शिवाजी नगर, ईतवारा, ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक मंडळांच्या आलेल्या दुर्गादेवी ची विधीवत पूजा करण्यात आल्या नंतर क्रेन चा साह्याने सुरक्षा रक्षक यांच्या वतीने खदानीत विसर्जन करण्यात आले.यावेळी उपनिरीक्षक तथा गुन्हे शोध पथकाचे प्रमुख आंनद बिचेवार , महेश कोरे व पोलीस अंमलदार यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता,खदान परिसरात बरिकेट व लाईट,क्रेन व्यवस्था मनपा प्रशासनाने केली होती तर जिवरक्षक दलाचे अध्यक्ष सय्यद नुर,गंगाधर कंदरवाड,संतोष जिल्हेवाड, विलास निलमवाड,शेख अजिज,शेख युनुस यांनी दुर्गादेवी चे विसर्जन केले. रात्री उशिरापर्यंत दुर्गादेवी विसर्जन चालूच होते.