हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयदशमीच्या शुभमुहूर्तावर शहरातील परमेश्वर मंदिरापासून सघोष पथसंचालन व शस्त्र पूजेचा कार्यक्रम संपन्न झाला.
दि.०५ बुधवारी हिमायतनगर (वाढोणा) येथे सकाळी ०९ वाजता श्री परमेश्वर मंदिरात प्रथम वाद्याच्या गजरात रंगीत तालीम घेण्यात येउन पथसंचालनाची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. गावातील महिलांनी सकाळी सडा - सरवान व रांगोळी काढून पथसंचालनाच्या स्वागताची तयारी केली होती. शोभायात्रेत युवकांनी संघाचे गणवेश धारण करून, हाती भगवा झेंडा, लाठी धरून सघोष संचलन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. पथसंचालनानंतर मंदिरात प्रांत संघटन मंत्री सुरेश दंडवते यांचे बौद्धिक भाषण झाले.