किनवट , माधव सूर्यवंशी| वीज वितरण कंपनीच्या ग्रामीण किनवट दोन युनिट चे कनिष्ठ अभियंता राम चव्हाण यांनी शेतकरी व इतर अनेक ग्राहकांकडून वसुलीच्या नावावर विना पावती वसुली करून ती गिळंकृत केल्या च्या व नियम बाहय विजकनेक्शन दिल्या असल्याच्या अनेक तक्रारी नागरीकानी आमदार भिमरावजी केराम यांच्या कडे केल्याने त्यांनी कनिष्ट अभियंता चव्हाण विरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी अधिक्षक अभियंता नांदेड यांच्याकडे केली आहे .
वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता राम चव्हाण हे लाच प्रकरणी निलंबित होऊन परत किनवट येथील ग्रामीण शाखा युनिट दोन येथे गेली दोन वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी विज मंडळाच्या वसुलीच्या नावावर असंख्य वीज ग्राहकाकडून विना पावती रक्कम जमा केली . कोणी पावतीची मागणी केली तर त्याचे विजेचे कनेक्शन तातडीने काढून घेण्याची त्यांना धमकी देतात . व कनेक्शन तोडतात ही . नियमबाह्य केबल द्वारे मोठी रक्कम घेऊन वीज कनेक्शन ही दिले जातात .
परंतु जे नियमित अधिकृत वीज जोडणी घेऊन विजेचे बिल भरतात अशांना जाणीवपूर्वक पैसे उकळण्या साठी नाहक त्रास देत असून ग्रामीण खेडेगावात सुरळीत वीज पुरवठा केला जात नाही .एखाद्या नागरिकांनी याबाबत चौकशी करून विचारणा केली तर त्यांच्याशी उद्धटपणे बोलून त्यांना कमरेखाली अर्वाचे भाषेत शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला करणे आदी प्रकारची त्यांची दिनचर्या चालु असल्याचे तसेच ताळेबंदी काळापासून वीणा पावती वसुलीची रक्कम स्वतः गिळंकृत करून जनतेसोबतच वीज वितरण कंपनीची ही दिशाभूल करीत आर्थिक लूट त्यांनी केली असल्याच्या अनेक तक्रारी आमदार भिमरावजी केराम यांच्याकडे नागरीकांनी केल्या आहेत.
आमदार भिमरावजी केराम साहेबानी कनिष्ट अभियंता राम चव्हाण यांच्या काळातील अनियमित्ता थांबून ग्रामीण भागातील जनतेस सुरळीत वीज सेवा देवून. सदरील लाचखोर लुटारू कनिष्ठ अभियंता राम चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध तातडीने कारवाई करावी. अशी मागणी विज वितरण कंपणीचे अधीक्षक अभियंता नांदेड यांच्याकडे केली आहे.