अर्धापूर| बुलढाणा अर्बन बॅकेचे कार्यकारी संचालक सुकेश झंवर यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात सर्व रुग्णांना केळी, सफरचंद सह आदि फळांचे वितरण करण्यात आले, यावेळी मोठ्या प्रमाणावर रुंग्णांची संख्या होती.
अर्धापूर शहरातील बुलढाणा अर्बन बॅकेचे शाखाधिकारी रामचंद्र बोंढारे पाटील यांच्या पुढाकारातून अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात बुलढाणा अर्बन बॅकेचे कार्यकारी संचालक सुकेशजी झंवर यांच्या वाढदिवसा निमित्त सफरचंद,केळी या फळांचे सर्व उपस्थित रुंग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी शाखाधिकारी रामचंद्र बोंढारे पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.महम्मद शाहेद, जिल्हा सचिव निळकंठराव मदने,डॉ.आनंद शिंदे, डॉ विशाल लंगडे,सखाराम क्षीरसागर,संदीप राऊत, बालाजी गंधनवाड, सरपंच अझरऊल्ला पठाण,शेख अलीम, रणधीर लंगडे,सचीन देशपांडे,वसंत राऊत, सुनिल मोरे,राजकुमार मदने, राहुल माटे, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर रुग्णांची उपस्थिती होती.