नांदेड| आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव 'राष्ट्रचेतना-२०२२' मध्ये मंगळवार दि.११ ऑक्टोबररोजी महोम्मद रफी स्वरमंचावर शास्त्रीय गायनाने रसिकांचे मने जिंकली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाची विद्यार्थ्यांनी कु.राजश्री पुपलवार यांनी 'मारू बिहार' हा राग गायीला. लातूर येथील कॉकशीट महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रेणुका मोरे यांनी 'पुरिया धनाश्री' हा राग गायीला. परभणी येथील शिवाजी कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अभिरूपा पैंजणे यांनी 'मधुवंती राग' सादर केला. याबरोबरच अदिती मुळे, साक्षी देशमुख, यांनीही शास्रीय गायन केले. या मंचावर प्रा. बालाजी भंडारे, प्रा. लहू वाघमारे हे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम करीत होते.