नांदेड| वैद्यकीय क्षेत्रात भुलतज्ञ हे काय काम करतो व समाजापर्यंत त्याचे विविध रूप कार्य पोहचविण्यासाठी एकात्मका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील रॅलीचे नांदेडमध्ये विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले असून गुरूद्वारा व विष्णुपूरी येथील शासकीय रूग्णालयात संघटनेच्यावतीने जनजागृती करण्यासाठी प्रात्यक्षीक करून दाखविण्यात आले.
एकात्मता ज्योत रॅली नागपूर मार्गे अकोला येथून नांदेड येथे दि. 9 ऑक्टोबर रोजी दाखल झाली. सदरील रॅलीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ही ज्योत दि. 15 ऑक्टोबर रोजी दिल्ली राजपथावर जाणार असून नांदेड येथे सचिव भुलतज्ञ डॉ. चांडोळकर, अध्यक्ष भुलतज्ञ संघटना डॉ. प्रल्हाद कोटकर यांनी जनजागृती करण्यासंदर्भात रॅलीचे नियोजन केले होते.
सोबत जीवन संजीवनीचा प्रभावी रूपाने त्यांनी प्रयत्न केला. विष्णुपूरी येथील शासकीय रूग्णालय, सचखंड गुरूद्वारा याठिकाणी जीवन संजीवनी हा समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोटकर, सचिव डॉ. सचिन चांडोळकर, डॉ. कलंत्री, डॉ. जी.के. देशमुख, डॉ. जाकीर पटेल, डॉ. सुरेखा साजनी, डॉ. सतिष राठोड आदींची उपस्थिती होती.