नवीन नांदेड। नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल सिडकोने राज्य इनडोर फुटबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या पहिल्या स्पर्धेत ज्युनिअर महाराष्ट्र इनडोर फुटबॉल चॅम्पियनशिप दिनांक ०१ ते ०२ ऑक्टोबर २२ दरम्यान नांदेड येथे संपन्न झाली.
पंधरा वर्षांखालील मुले व मुली यांनी इनडोर राज्यस्तरीय फुटबॉल चॅम्पियनशिप मध्ये मुलींनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. नांदेड संघाला दुसरे पारितोषिक मिळाले असून, नांदेड संघाचे नेतृत्व नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल सिडकोच्या मुलींनी केले होते. नांदेड संघामध्ये नालंदा शाळेतील मुलींचा समावेश होता.कर्णधार धैर्या ब्रह्मनाथकर, अवनी वणजे, अनुष्का गोडघासे,प्रतीक्षा ठाकूर, श्रावणी वाघमारे, साक्षी पवार, राजनंदनी बिडवई,सुप्रिया गवळे, माहेश्वरी कदम या मुलींचा समावेश होता. या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा शैला पवार, सचिव केशव गड्डम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.लता तम्मेवार, श्रीकांत गड्डम,सौ.दुर्गा गड्डम,पिल्ले,शाळेतील क्रीडा शिक्षक कासिम खान व निलेश डोंगरे यांनी यशस्वी मुलींचे अभिनंदन केले आहे.