मुखेड। शहरांमध्ये ६७ व्या धम्मचक प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न बौध्दीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली विजया दशमी दिनी देशातील लाखो समाज बांधवाना भंते चंद्रमुनीच्या हस्ते बौध्द धम्माची दिक्षा देऊन चातुर्वर्ण्याच्या विषमतेवर अंधारलेल्या अनिष्ट रूढी परंपरेच्या गुलामीतून मुक्त करून समता, बंधुत्व आणी न्यायावर आधारित विज्ञानवादी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.
या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार दि.५ आक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता मुखेड शहरातील डॉ.आंबेडकर स्मारकातील तथागत भगवान बुद्ध आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पुजन उपस्थित बौद्ध अनुयायांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बुद्ध मुर्ती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास प्रा.वाय.एच कांबळे व गंगाधर सोंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष गंगाधर सोंडारे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर उपस्थित बौद्ध उपासक व उपासिकांनी सामुहीक बुद्धवंदना घेण्यात आली.
यावेळी दिपक लोहबंदे , बाबुराव घोडके, डॉ राहुल कांबळे,बाबुराव येवतीकर ,डि.पी वाघमारे, आंनद जोंधळे , के.एन कांबळे , गायकवाड , मरिबा वाघमारे ,अँड.नवनाथ भद्रे, सरपंच साहेबराव वाघमारे ,पत्रकार रणजित जामखेडकर,उत्तम कांबळे , सुमेध भद्रे ,अनिल बनसोडे, बंटी भद्रे शिरूरकर, चिंटू कांबळे , अशितोष कांबळे यांच्या सह तालुक्यातील बौद्ध उपासक - उपासिका व तालुक्यातील धम्म बांधवांची मोठी उपस्थिती होती.