हिमायतनगर| शहरातील लाकडोबा चौकातील रहिवाशी आलेल्या एका युवकांचा शेतातील विहिरीत पाणी पिण्यासाठी गेला असता पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नवरात्रोत्सवात घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र दुःखाचे सावट निर्माण झाले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत शंकर पोतना बलपेलवाड वय २८ वर्ष हा दि.३० रोजी सकाळी शेतीकडे गेला होता. दुपारी तहान लागल्यामुळे हा त्याच्या काकाच्या शेतशिवारात गट क्रमांक २२४ मध्ये असलेल्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला असता. अचानक पाय घसरून तो विहिरीत पडला, विहिरीत पाणी जास्त आल्याने त्यास बाहेर निघत आले नाही. त्यामुळे विहिरीच्या पाण्यात बुडून शंकरचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या मदतीने मयत युवकचे मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज दुपारू शोकाकुल वातावरणात मयत युवकावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. या संदर्भात हिमायतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अशोक सिंगणवाड हे करत आहेत.