पशुधन विकास अधिकारी शेतकरी नेत्यावर बरगळे - अश्र्शील अन् बेताल वक्तव्याने शेतकऱ्यांत प्रचंड संतापाची लाट -NNL

मुखेड पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.धनराज मुर्कीकर यांना निलंबित करण्याची मागणी.


मुखेड/नांदेड|
राज्यासह नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातही जनावरांना होत असलेल्या लंपी आजाराची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे.दरम्यान,यासाथीत दगावलेल्या जनावरांच्या मृत्यू विषयी विचारणा करण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग पा.शिंदे यांनी मुखेड पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.धनराज मुर्कीकर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता मुर्कीकर यांनी गायी चे मृत्यू भूकबळी ने होत असून तुम्हीच लोक गायीना मारत आहात असे म्हणत अश्र्शील भाषेत शिंदे यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप शनिवारी समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

तालुक्यातील धामणगाव येथे गेल्या काही दिवसांत जनावरांचा आजारी पडून मृत्यू झाला.यामध्ये गायींचा समावेश आहे.शवविच्छेदन झालेला अहवाल शेतकऱ्यांना मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे-मांजरमकर यांच्याकडे तक्रार केली होती.तक्रारीच्या अनुषंगाने शिंदे यांनी मुखेड पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.धनराज मुर्कीकर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून धामणगाव येथे गायींचा मृत्यू कशामुळे झाला? शवविच्छेदन केले का? त्यामध्ये काय निष्पन्न झाले? संबंधित शेतकऱ्यांना शवविच्छेदन अहवाल तुम्ही का देत नाहीत? असे प्रश्न विचारले त्यावर उत्तर देताना पशुधन विकास अधिकारी डॉ.मुर्कीकर यांचा पारा चढला ''शवविच्छेदन अहवाल पाहीजे असेल तर सेवा शुल्क द्यावे लागते.

त्याशिवाय अहवाल देवू शकत नाही'' तुम्हाला काय माहीती आहे? गायींचा मृत्यू लंपी आजाराने नाही तर भूकबळी ने झाला आहे.तुम्हीच लोक गायींना मारत आहात.असा आरोप करत अत्यंत अश्र्शील भाषेत शिवीगाळ केली.दरम्यान,या संवादाची ऑडिओ क्लीप समाजमाध्यमावर व्हायरल झाली.त्यानंतर अनेकांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करून संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्याला सेवेतून तातडीने निलंबित करण्याची मागणी लावून धरली आहे. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी याघटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.संबधित डॉ.मुर्कीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही रयत क्रांती शेतकरी संघटनेने दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी