हिमायतनगर| शहरातील नवनिर्माण महिला दुर्गा मंडळाच्या वतीने आज रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात मोठ्या प्रमाणात महिलांस पुरुष व युवकांनी रक्तदान करून समाजकार्यात हातभार लावला आहे.
दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर सण - उत्सव आनंदाने साजरे केले जात आहेत. हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर गल्लीतील नवनिर्माण महिला दुर्गा मंडळाच्या वतीने दरवर्षी दुर्गा मातेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून सकाळ संध्याकाळी आरती व महाप्रसाद केला जातो. त्याचा पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम म्हणून आज दि. ०१ ऑकटोबर रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
यावेळी गजानन चायल, काळे काका, लक्ष्मण डांगे, सदा काळे, परमेश्वर काळे, अनिल नाईक, बास्टेवाड, हरडपकर, आदींसह महिला मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रक्तदान शिबिरात रक्त सनकलांसाठी नांदेड येथील गुरु गोविंदसिंग रक्तपेढीची टीम दाखल झाली होती. सायंकाळी व्रत लिहीपर्यंत ५० हुन अधिक पिशव्या रक्त संकलन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.