पळसपुर येथील सर्व पशुपालक वर जंगली कोल्ह्याची दहशत -NNL

वनविभागाने केलंय शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष


हिमायतनगर/पळसपुर, कल्याण पाटील।
शेतकरी हा आधीच अतिवृष्टीच्या दृष्ट चक्रात अडकलेला असताना आता त्याच्यावर नवीन एक संकट पळसपूर येथे पशुपालकावर उभे झाले आहे. आता शेतकऱ्यांनी आपली पशुधन ठेवाव की न ठेवावी याच्यात अडकलेला आहे.

पळसपुर गावांमध्ये जंगली कोल्ह्यांचा फार मोठ्या प्रमाणात वावर आहे. पण आता त्यातील काही केले हे पिसाळलेले आहे. पळसपुर गावातील अनेक कोल्हे पिसाळलेल्या अवस्थेत आहेत. अक्षरशा पिसाळलेल्या कोल्हा पळसपुर गावात फार मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. त्यात अनेकांना हे कोल्हा चावले आहेत. परिणामी अनेक म्हैस गाय वासरू बैले मुत्यू पावत चालली आहे. वनविभागाला कळवून सुध्दा त्यांच्या वतीने पिसाळलेल्या व भटक्या कोल्हाना योग्य बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. मात्र वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जातो आहे.


कारण त्या जनावरांचे मास खाल्ल्याने परिसरातील भटके कुत्रेही पीसळलेले फार मोठ्या प्रमाणात होत आहे. असे चावलेल्या भटक्या कुत्र्यामुळे जनावरे फार मोठ्या प्रमाणात मरू शकतात. आणि माणसांना सुद्धा धोका होऊ शकतो. पण कोणाताही शासकीय अधिकारी प्रयत्न करीत नाही. रोज गुरे मरत चालली आहे. यावर वन विभाग कोणतेही कारवाई करीत नाही. त्यामुळे व विभागाचा कारभार उंटावरून शेळ्या
हाकण्याजोगा झाला आहे. हिमायतनगर येथिल वनपरिक्षेत्र कार्यालयात अधिकारी आठ आठ दिवस येत नसल्याने वनपरिक्षेत्र कार्यालयात रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.

मृत्यू पावलेल्या जनावरांच्या मालकांना कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई सरकारकडून मिळत नाही वन विभागवाले सांगतात की तुम्ही पशुवैद्यकीय डॉक्टरांचे पीएम आणून द्या. पण ते पण मिळत नाही आणि कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत नाही शेतकऱ्यांनी करावी काय हे तरी सांगावे. काल बाबुराव शिरफुले यांच्या अंदाजे 70 हजार किमतीच्या बैलास कोल्ह्याने चावा घेतल्याने मरण पावला आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही तोंडी सूचना देवून कोणत्याही अधीकार प्रतिसाद देत नाही, शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांचे पशुधनाची सुरक्षिततेची हमी द्यावी. अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी