नविन नांदेड। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सिडको अतिवृष्टी दुष्काळ अनुदान पोटी शाखा सिडको अंतर्गत असणा-या आठ गावातील ५३९० शेतकऱ्यांना ४ कोटी ७५ लक्ष १८ हजार ८०८ निधी शाखेला मुख्यशाखे कडून प्राप्त झाले असून, सदरील अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले असुन सोमवार पासून हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
अतिवृष्टी अनुदान २२ सालासाठी अनुदान पोटी सिडको नाजिमंस बँक शाखेचे अंतर्गत असलेल्या आठ गावातील अनुक्रमे बोरगाव कि.येथील ५७३ शेतकरी सभासदसाठी ४५२४.९९२ लोंढे सांगवी, ५७९ सभासद साठी ४९९३ .५१२ तर जोशी सांगवी, ८६० सभासद साठी ७८४९.३९२ किवळा, ७७१सभासदासाठी ८६४० २१६ साठी वडगाव, येथील ५१४ ३१०७.७३६ टेळकी येथील ९३३ सभासद साठी ८९८७.४२४ ढाकणी येथील ५६६ सभासदसाठी ४७४२.१८४ टाकळगाव येथील शेतकरी सभासद ५९४ सभासद ४६७९.३५२ अशी रक्कम खात्यात अनुदान जमा झाले असून सोमवार १७ आक्टोबंर पासून वाटप करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक विठ्ठल पवळे व रोखपाल राजीव देशमुख यांनी केले आहे. या अनुदानामुळे शेतकरी बांधवात समाधानाचे वातावरण पसरले आहे.