राज्यस्तरीय बॉल बॕडमिंटन स्पर्धासाठी; लातूर संघ रवाना -NNL


माळाकोळी/लोहा।
दिनांक १४ ते १६ आक्टोबर २०२२ दरम्यान गोंदिया - महाराष्ट्र  येथे होणाऱ्या ४१ व्या महाराष्ट्रा स्टेट सब ज्युनिअर बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशिप २०२२ - २३ साठी दोन दिवस अगोदर रोजी लातूर जिल्ह्याचा संघ रवाना झाला असून संघातील खेळाडूंचे , संघ प्रशिक्षकांचे अहमदपूर व नांदेड येथे मोठया उत्साहानं स्वागत व सत्कार करण्यात आले...

लातूर जिल्हा संघात किलबील नॕशनल स्कुल, ज्ञानवर्धिनी विद्यालय,यशवंत विद्यालय, नारायणा इंटरनॕशनल स्कुल,महात्मा फुले विद्यालय अशा जिल्ह्यातील विवीध शाळेतील खेळाडूंचा समावेश आहे. मुलींच्या संघात - मानसी घोगरे (कर्णधार), स्नेहा सुर्यवंशी, शुभांगी जाधव,जान्हवी पाटील , अदिती गुरुडे, श्रद्धा होणराव, रोहिणी सुर्यवंशी , रागीणी यादव, माया सुर्यवंशी तर संघ प्रशिक्षक संध्याराणी येळीकर हे आहेत. मुलांच्या संघात - शाहिद  शेख (कर्णधार), ह्रूषीकेश गोटमुखले, विराज सुर्यवंशी , शंभुराज काटे, अभय भोसले, व्यंकट यादव, नामदेव पाटील , ह्रूषीकेश सुर्यवंशी , विश्वजीत पाटील तर संघ प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू बी.एल.अभिजीत सर व अर्शद शेख हे आहेत...

लातूर जिल्हा संघाने गेल्या १४ वर्षांपासून शालेय विद्यापिठीय, असोसिएशन अश्या विविध स्पर्धांत उत्कृष्ट कामगीरी करून  महाराष्ट्रात ठसा उमटवला आहे . मुले खेळाडूंमध्ये  अकबर पठाण, चेतन मुंडे, अदनान शेख, तानाजी कदम, माधव सगरे, नईम शेख, संगमेश्वर लाटे, माधव सोनटक्के, आशू शेख, विकास जायभाये, फैजान शेख, मिरान शेख,  निहाल पठाण, अर्शद शेख,  वैभव कदम, प्रशांत सुरनर, माधव भिसे, सचीन भगत, खंडूसर, सागर  किरण,  यश जाधव, यांनी तर मुलींमध्ये मनिषा सुर्यवंशी , उज्वला राठोड, पृथ्वी यादव, विद्या अंभोरे, पुजा राठोड,कल्पना पौळ, निता बानाटे,कोमल पौळ, आशा जाधव, प्रणीता ठवरे, अनु पाटील,स्वाती औसेकर, मनिषा माने, अश्विनी राठोड, स्वाती मुंडे, गंगा केंद्रे , प्रणीता सुर्यवंशी , रोहिणी सुर्यवंशी , कांचन उमाटवाडे, या खेळाडूंनी नेत्रदिपक कामरीने महाराष्ट्रात विजय प्राप्त करीत देशपातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत यश संपादन केलेले आहे...

खेळाचा व विशेष कौशल्याचा वारसा असलेल्या या खेळाडूंचे प्रशिक्षण जिल्हा संघटनेच्या अधिनस्थ असद स्पोर्टस् अकॕडमी येथे होत आहे. लातूर जिल्ह्याचे भुमीपुत्र व सध्या नांदेड जिल्ह्यात पोलीस दलामध्ये एक निर्भीड, गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे कर्तव्यदक्ष अधिकारी असद शेख यांनी या खेळात अनेक जिल्हा ,राज्य व राष्ट्रीय स्पर्धांत विजय मिळवित देशाचे प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक प्राप्त करीत मानाचा स्टार अॉफ इंडिया हा पुरस्कार ही मिळविला आहे सध्या ते याच खेळाचे जिल्हा सचिव आहेत...

उत्कृष्ट खेळ व यशस्वी वाटचालीचा वारसा असलेल्या या संघानेही राज्यस्तरीय स्पर्धेत  यश संपादन करून नाव उज्वल करावे म्हणून जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संगमेश्वर निला, किलबील नॕशनल स्कुल चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानोबा भोसले, सचिव असद शेख, अकबर पठाण, अयुब जहागीरदार, तबरेज सय्यद , मुख्याद्यापक संतोष पाटील, शफी शेख, प्रमोद पाटील व इतर अधिकारी पदाधिकारी यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ...

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी