नांदेड| राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी, जांब समर्थ येथे स्वतः प्रभू श्रीरामांनी दिलेले श्रीराम पंचायतन जे चोरीला गेले होते ते आज सापडल्याने समर्थ भक्तांनी आज दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या हजारो साधकांकडून आज घरोघरी देवा समोर दिवा लावून व साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
राष्ट्राचा हा अमोल ठेवा मिळवण्यासाठी अथक उपासना, अनुष्ठान करणारे समर्थभक्त, प्रशासनातीले सर्व सहोदर आणि पोलीस तथा विशेष तपास यंत्रणेतील सर्व अधिकारी आणि निर्णय घेऊन ठोस कार्यवाही करणारे महाराष्ट्र राज्य सरकार व आमदार राजेश टोपे तथा सर्व आमदार व खासदारांचे दा.स.अ. उपक्रमातर्फे जाहीर आभार व कृतज्ञता व्यक्त करीत समर्थमूर्ती सापडल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.