लोहा| दिवाळी सणाचा आनंद आपल्या कुटुंबा सोबत शेअर करण्याचा काळ असतानाच दुसरीकडे' या सगळ्या 'आनंदी आनंद वातावरणाला बाजूला ठेवत' कर्तव्यावर हजर होणाऱ्या कंधार उपविभागीय अधिकारी डॉ मंडलिक व तहसीलदार मुंडे यांच्या टीम ने पेनूर व येळी येथे सलग दोन दिवसा पासून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या विरुद्ध धडक कार्यवाही सुरु होती. यात १४ तराफे जाळण्यात आले.
दिवाळीचा सण गावाकडून अद्याप परतला नाही कामाच्या ताणतणावातून काही काळ बाहेर पडत' गावाकडे जून्या आठवणीत नव्या पिठी सोबत अनुभव शेअर करणारे अधिकारी, कर्मचारी आपल्या भूमीत रममाण झालेले आहे, पण कंधार उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक व टीमने दिवाळी काळातच बाबू बेकायदेशीर वाळू उपसा करणाया विरुद्ध कडक कार्यवाहीची मोहिम राबविली आहे
पेनूर येथे स्वत: उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या टीमने नदीतून बेकायदा वाळू काढणारे सात तराफे नष्ट केले यात. मंडळ अधिकारी डी. एल कठारे, तलाठी राजू इंगळे, व्ही. के पाईकराव यांचा पथकात समावेश होता.
येळी येथे भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी गोदा पात्रातून वाळू बेकायदेशीर उपसा करणाऱ्या विरुद्ध उपजिल्हाधिकारी डॉ. मंडलिक, तहसीलदार मुंडे यांच्या पथकाने कार्यवाही करीत सात तराफे जाळले. मंडळ अधिकारी सहारे, तलाठी मोतीराम पवार, कोतवाल विठ्ठल ढेपे यांचा यात समावेश होता. दिवाळी काळात पेनूर, येळी येथे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या विरुद्ध झालेल्या कार्यवाही के अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.