शेतकरी पुञ संर्घष समितीचे बालाजी ढोसणे यांची जिल्हाधिकार्याकडे मागणी
नांदेड। जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 व 2021 सालचा पिकविमा शेतकर्यांना ऊस्मानाबाद(धाराशिव)जिल्ह्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे NDRF नुसार नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना वाटप करण्याची मागणी शेतकरी पुञ संर्घष समितीचे बालाजी पाटील ढोसणे,मन्मथ खंकरे,माधव देवकत्ते,तुकाराम पाटील सुडके,दत्ता पाटील गोपनर,गुलाब भद्रे यांनी जिल्हाधिकार्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
नांदेड जिल्ह्यात जवळपास दहा लाख शेतकर्यांनी 2020—21 सालचा खरीप हंगाम पिकाचा पिकविमा उतरविला होता पण जाचक अटीमुळे शेतकर्यांना मिळाला नसल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने भरपाई देण्याचे आदेश दिलेत.पण प्रशासनाने कंपनीला आज पर्यत याबाबत जनजागृती केलेले दिसुन आले नसल्याने ढोसणे यांनी NDRF सर्वोच्च न्यायालयाच्या निकषानुसार नांदेड जिल्ह्यातील प्रशासनाने कठोर पावले उचलुन शेतकर्यांना 2020 — 21 सालचा ऊर्वरीत पिकविमा शेतकर्यांना वाटप करावा याबाबत कंपनीला वाटपाचे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकरी पुञ संर्घष समितीच्या वतीने करण्यात आल्याने पिकविमा कंपनीचे धाबे दणाणले आहे.
तर नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आधार घेवुन पिकविमा मिळवुन देणारच असे बालाजी ढोसणे यांनी सांगून ऊस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांना जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला तोच निर्णयाचा आधार घेवुन नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना NDRF प्रमाणे पिकविमा मिळवुन देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगीतले.