डॉ. हनुमंत भोपाळे यांना संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक पुरस्कार जाहीर -NNL


नांदेड।
नांदेड येथील सुप्रसिध्द साहित्यिक तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांना हिंगोलीच्या समृध्दी प्रकाशनातर्फे देण्यात येणारा संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे. यापूर्वीही डॉ. हनुमंत भोपाळे यांना महाराष्ट्र शासन, कोकण मराठी परिषद पणजी, जागर प्रकाशन गोवा, इत्यादी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांनी उत्कृष्ट लेखनाबद्दल पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे.


डॉ. भोपाळे यांचे साहित्यिक योगदान मौलिक असून, त्यांच्या 'यशाचा राजमार्ग'ह्या ग्रंथाची निवड महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट ग्रंथाच्या यादीत केली आहे. त्यांच्या नावावर शीखगुरू चरित्र आणि कार्य, प्रेरणा, ध्येयवेध, साधना, पुन्हा प्रेरणा, यशाचा राजमार्ग, दीपस्तंभ, प्रगतीचे विचारधन, समृद्धीच्या वाटा, साफल्य, मनतरंग, उत्कृष्ट प्रशासक, परिवर्तन, आकलन, उकल, आदी ग्रंथसंपदा तसेच शेकडो लेख प्रकाशित आहेत.

महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर गोवा, पंजाब, हरियाणा आदी ठिकाणी त्यांनी वैचारिक प्रबोधनाचे कार्य केले आहे. गोवा राज्यातील कोकण मराठी परिषदेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्यांचा बहुमानही त्यांना मिळालेला आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बहि:शाल व्याख्यानमालेच्या माध्यमातून आणि त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरून ते सातत्याने प्रबोधनाचे कार्य करतात. डॉ. हनुमंत भोपाळे हे आपल्या लेखणी , वाणी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून करत असलेले प्रेरणादायी कार्य तसेच त्यांच्या आकलन आणि उकल ह्या उत्कृष्ट ग्रंथाची मौलिकता लक्षात घेऊन यावर्षीचा संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक पुरस्कार त्यांना जाहीर केल्याचे पुरस्कार समितीचे संयोजक तथा शिवाजी महाविद्यालय हिंगोलीचे प्रा. डॉ. श्रीराम क-हाळे यांनी  प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे. 

या पुरस्कार प्राप्तीबद्दल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष तथा माजी आमदार अमिताताई चव्हाण, संस्थेचे सचिव तथा माजी राज्यमंत्री डी .पी. सावंत, सहसचिव उदय निंबाळकर, खजिनदार प्राचार्य रावसाहेब शेंदारकर, लक्ष्यवेध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ मोरे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, प्राचार्य डॉ. आर. पी. माळी, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, सुप्रसिध्द वक्ते इंजि. शिवाजीराजे पाटील, साहित्यिक शिवा कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी