लोहा| लोहा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेसह अन्य वृध्दोपकाळ निवृत्ती वेतन योजनेतर्गत तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी ऐन दिवाळी काळात या लाभार्थ्याचे पेन्शन बँकेला वर्ग केले. त्यामुळे तालुक्यातील आठ हजर १२ लाभार्थ्यांच्या बँक -पोस्ट खाती २ कोटी ८७ लक्ष ६४ हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. यंदाची दिवाळी गोड होणार असून जुलै ते ऑक्टोबर या चार माहिण्याचे मानधन मिळणार आहे.
लोहा तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून वेळेवर बँकेत मानधन जमा होण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे व टीमने प्रयत्न केले व त्यांना यश आले. संजय गांधी निराधार योजना सर्वसाधारण २ हजार ५७५ लाभार्थी आहेत त्याचे ९७ लक्ष ४४ हजार ८०० रुपये. याच योजनेतील अनुसूचित जातीचे ३०४ लाभार्थी सून त्याची त्याचे ११ लक्ष २६ हजार ४०० रुपये तर अनुसूचित जमातीचे १५ लाभार्थ्याचे ५४ हजार रुपये त्यांच्या बँक खाती जमा होणार आहेत. श्रावण बाळ सेवा राज्य निवृती वेतन योजनेतर्गत सर्व साधारण लाभार्थी ४ हजार ४९८ इतके असून त्यांचे १ कोटी ७० लक्ष ९ हजार ६०० रुपये .याच योजनेत अनुसूचित जातीचे २२० लाभार्थी आहेत. त्यांचे ८ लक्ष १४ हजार, रुपये तर अनुसुचित जमातीचे पाच लाभार्थी आहेत त्यांचे १६ हजार असे बँक खाती जमा होणार आहेत.
तालुक्यात संगांनि योजना अंतर्गत ८ हजार १२ लाभार्थी असून, या लाभार्थ्यांचे २ कोटी ८७ हजार ६४ हजार ८०० रुपये इतकी रक्कम बँकेकडे वर्ग करण्यात आले त्यामुळे संगानि योजने तील लाभार्थ्याची दिवाळी गोड होणार आहे. हे चार महिण्याचे मानधन आहे. तहसीलदार व्यंकटेश मुंडे, या विभागाचे नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी वेळेवर हे मानधन जमा केले. विभाग प्रमुख श्रीमती चाटे, मळगे यांनी परिश्रम घेतले त्यामुळे लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे.