उस्माननगर, माणिक भिसे। जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह उस्माननगर येथील संस्थापक अध्यक्ष कै.आर्जुनराव कांबळे साहेब यांच्या आठव्या ( स्मृतीशेष ) पुण्यतिथीनिमित्त वस्तीगृह उस्माननगर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
उस्माननगर सारख्या ग्रामीण भागात चाळीस वर्षांपूर्वी कै.आर्जुनराव कांबळे यांनी वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहात ग्रामीण भागातील गोरगरिबांचे लेकर या वसतिगृहात राहून उच्च असे शिक्षण घेता यावे. या उदात हेतू डोळ्यासमोर ठेवून वसतिगृह चालू केले. या वसतिगृहातून अनेक विद्यार्थी शिक्षक, अधिकारी, व्यवसायिक, असे अनेक विद्यार्थ्या उच्च पदावर काम करत आहेत.
गोरगरिबांच्या लेकराना राहाण्याची उत्तम सोय उपलब्ध करून दिली. गावातच शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत आहे. वसतिगृहात उत्तम राहाण्याची सोय, जेवणाची व्यवस्था करण्यात आली.आज या वसतीगृहात जवळपास बासष्ट ६२ विद्यार्थी संख्या आहे.चार ऑक्टोबर रोजी कै.आर्जूनराव कांबळे यांचा आठव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जवाहरलाल नेहरू वि.वसतिगृह उस्माननगर येथील कर्मचारी लक्ष्मण कांबळे , उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे,उपाध्यक्ष माणिक भिसे, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.