जून महिन्यात घेतलेल्या नोंदणीसाठी 2000 दिव्यांग बांधवांची उपस्थिती
हदगाव, शे चांदपाशा। आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्य प्रयत्नातून साकारलेल्या कृत्रिम अवयव व पायाभूत साधने मोफत वाटपासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून जून महिन्यात घेण्यात आलेल्या नोंदणी शिबिरात जवळपास 2000 दिव्यांग बांधव मोफत साधने मिळवण्यासाठी आपले नाव नोंदणी केले होते त्यापैकी 850 दिव्यांग बांधवांना आमदार जवळगावकर यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय भारत सरकार कृतीम अंग निर्माण जिल्हा प्रशासन समाज कल्याण जिल्हा परिषद विकास संघर्ष समिती आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यात सर्वप्रथम हदगाव येथे आमदार जवळगावकर यांच्या प्रयत्नातून दिव्यांग बांधवांच्या मोफत साधने वाटपाच्या जून महिन्यात पार पडलेल्या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला होता या शिबिरास हजारोच्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते त्यापैकी 850 मंजूर झालेल्या दिव्यांग बांधवांना साहित्याची वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास तहसीलदार जीवराज डापकर , वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्ही . जी ढगे ,डॉक्टर प्रदीप स्वामी , काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आनंद भंडारे, जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील, माजी जिल्हा परिषदेचे पंजाबराव पाटील, शिवप्रसाद पाटील ,किशोर पाटील , मारोतराव शिंदे, सुभाष राठोड, माजी उपनगराध्यक्ष सुनील सोनुले, माजी नगराध्यक्ष अमित आरसूळ, सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष अनिल पवार, युवक काँग्रेसचे संदीप शिंदे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गोपाळ पवार, आत्माराम पाटील, संतोष माने, शहराध्यक्ष खदीरखान ,नगरसेवक फिरोज पठाण, बालाजी राठोड सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सविता चव्हाण ,दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल हदगाव चे दिव्यांग शाळेचे विशेष शिक्षक गजानन मोरे, आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात दिव्यांगासाठी व्हीलचेअर, ट्राय सायकल, ट्राय मोटारसायकली, चष्मे काठ्या, श्रवण यंत्रे, कुबड्या, ब्रेल किट, जयपूर फूट अदि मोफत साधने वाटप करण्यात आले आहेत.
आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मागील दहा ते बारा वर्षांपूर्वी अशाच एका मोठ्या दिव्यांग बांधवांच्या मोफत साधने वाटपाच्या शिबिराचे आयोजन केले होते त्या दरम्यान हजारोच्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होऊन जळगावकर यांनी घेतलेल्या मोफत साधने वाटपाच्या शिबिराचा दिव्यांग बांधवांनी लाभ घेतलेला पाहावयास मिळाला.
आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मागील काही महिन्यांपूर्वीच दिव्यांग बांधवांना व्हील चेअर वाटप केले होते जवळगावकर यांच्या माध्यमातून वेळोवेळी दिव्यांग बांधवांना काही ना काही मदत मिळत असते त्यामुळे दिव्यांग बांधवाचे आमदार जवळगावकर हे आधारवड असल्याचे दिव्यांग बांधव बोलत आहे. जवळपास आलेल्या दोन हजार दिव्यांग बांधवातुन एक हजार दिव्यांग बांधवां या शिबिरास पात्र ठरले असून हे शिबिर दोन दिवस ठेवण्यात आले होते.
दिव्यांग बांधवांसाठी आमदार जवळगावकर बनले आधारवड
आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे वेळोवेळी दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी पुढे येतात हे वेळोवेळी बघावयास मिळाले अनेक वेळा दिव्यांग बांधवासाठी शिबिरे आयोजित करून जळगावकरांनी त्यांना साधने वाटप केली परिणामी आमदार जवळगावकर हे दिव्यांग बांधवाचे आशेचे किरण ठरले असून ते आधारवड असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.