नांदेड। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कन्हेया कदम हे शहर जिल्हाध्यक्ष पदभार मागील पाच वर्षापासून संभाळत होते. त्यांची एक महिन्यापूर्वी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तेव्हापासून जिल्हाध्यक्षपद हे रिक्त होते.
15 दिवसापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी निवड प्रक्रियेला सुरुवात केली, त्यामध्ये 18 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्या सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या सूचनेनुसार विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम यांनी प्रदेशाध्यक्ष गव्हाणे यांच्या मान्यतेने फैसल सिद्दीकी यांची निवड जाहीर केली.
या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कन्हैया कदम, प्रसाद पवार, रोहीत पवार, मोहम्मद अरसलान, योगेश शिंदे, शेख मुखिद, चन्नावार यश, काटले वैभव, सुमित साबळे, अभिषेक शिंदे, रितेश, कुणाल गिरी हे उपस्थित होते.