जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अवैधरित्या वाळु ऊपासा करणा-या ट्रक चालकासह वाळु घाटावर केली कार्यवाही -NNL


नविन नांदेड।
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी सकाळी असरजन येथे अवैधरित्या वाळु उपास करून घेऊन जाणाऱ्या पाच वाहने आढळून आले व असरजन घाटावर गोदावरी नदीच्या पात्रात अवैध रित्या ऊपासा करणा-या मोटारी,तराफे नष्ट  कार्यवाही केली असून या घटनेमुळे अवैध रित्या ऊपासा करणा-या संबंधितात खळबळ उडाली आहे.

नांदेड जिल्हायाचे नुतून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी सकाळी सात वाजता रविनगर कौठा भागातुन असरजन कडे येत असतांना  पाच वाहने अवैध रित्या वाळू उपसा करून भरून जात असताना आढळले व त्यानी ते  तहसिल कार्यालयात कार्यवाही साठी जप्त केल्या, यात  ट्रक क्रमांक एम.एच.२२ .२१७६, एम.एच.१२ ई.कयु.२०१७, एम.एच.०४सि.जी.९७२९,एम

एच,१३ ए.एन.१३५०,एम.एच.०४ ईल २०२१ यांच्या समावेश असुन या नंतर जिल्हाधिकारी राऊत,निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी स्वतः गोदावरी नदीच्या पात्रालगत असलेल्या असरजन घाटावर अवैध रित्या वाळु ऊपासा करणा-या अनेक मोटारी ल तराफे पाहून तात्काळ जप्त करून  तराफे नष्ट करण्याचे आदेश दिले या वेळी मंडळ अधिकारी के.एम.नागरवाड हे ऊपसिथीत होते.

यानंतर घाटावर महसूल प्रशासनाने ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना संपर्क साधलया नंतर घाटावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, गुन्हा शाखेचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक आंंनद बिचेवार ,माणिक हंबर्डे,सपोऊपनी शेषेराव शिंदे,व पोलीस अंमलदार यांच्या कडे कोट बंदोबस्त मध्ये गोण खनि कर्म अधिकारी विजय अवधाने, नायब तहसीलदार जिअका दिवाकर,नायब तहसीलदार मुगाजी काकडे,श्रीमती संजिवनी मुपडे, मंडळ अधिकारी के.ए.नागरवाड, आर.डी.शिंदे, तलाठी मनोज देवणे, संताजी दैवापुरकर यांच्या ऊपसिथीत चार मोटारी जप्त व २५ तराफे नष्ट करण्यात आले.या कार्यवाही मुळे गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध रित्या वाळु ऊपासा करणा-या संबंधितात खळबळ उडाली आहे.

तहसील कार्यालय नांदेड येथे अवैधरित्या ऊपासा करण्यासाठी जप्त करण्यात आलेल्या मोटारी व तराफयासाठी लागणारे लोखंडी साहित्य आणुन टाकले असुन वाहनेही जप्त केले आहे हि कार्यवाही ऊपसिथीत अधिकारी व मंडळ अधिकारी,तलाठी व पुरुष मजुर यांच्या ऊपसिथीत दिवसभर करण्यात आली, यावेळी परिसरातील अनेक भागात  मोठ्या प्रमाणात या कार्यवाही ची चर्चा होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी