नवीन नांदेड। काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये दि ६ नोव्हेबर रोजी नांदेड जिल्हयात दाखल होणार आहे, दि ९ रोजी मोदी टायर मैदान येथील सहभागी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाठी जवाहरनगर तुप्पा व सिडको परिसरा लगत असलेल्या औद्योगिक वसाहतील सिप्टा येथे दूपाराचा जेवणा संदर्भात ठेवण्यात आलेल्या दोन्ही स्थळाची पहाणी माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली १५ आक्टोबंर रोजी पाहणी केली असून ,यावेळी संबंधीताना योग सुचना दिल्या आहेत
काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी "भारत जोडो यात्रा" पदयात्रा काढली आहे ,हि यात्रा नांदेड जिल्हायात ६ नोव्हेबर रोजी दाखल होणार असून देगलुर मुक्काम व दुसऱ्या दिवशी ७ रोजी शंकरनगर येथे मुक्काम होणार असुन तिसऱ्या दिवशी ८ तारखेला ऊमरा फाटा वाका येथे मुक्काम असुन ९ आक्टोबंर ला दुपारी नांदेड शहरात दाखल होण्या अगोदर नांदेड दक्षिण भागातील नांदेड हैद्राबाद रस्त्यावरील मोदी टायर मोकळ्या जागेत जवाहर नगर तुप्पा व चंदासिंग काँर्नर परिसरा लगत असलेल्या औधोगिक वसाहातीतील सिप्टा स्टील कंपनीत सहभागी पदयात्रेतील पदाधिकारी व निमंत्रित साठी जेवणाच्या जागेच्या संदर्भात ठेवण्यात येणा-या जागेची पहाणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दि १५ आक्टोबंर रोजी सकाळी केली,यात मोकळ्या जागी व सिप्टा कंपनीतील विविध भागाची पहाणी करुन या संर्दभात संबंधीताना योग्य त्या सुचना केल्या.
यावेळी विधान परिषदेचे आ.अमरनाथ राजुरकर ,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सभापती किशोर स्वामी, युवा नेते राहुल हंबर्डे,माजी उपमहापौर आनंद चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे ,गंगाप्रसाद काकडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव गुंडले ,श्रीनिवास मोरे,धनेगावचे सरपंच पिटु पाटील शिंदे ,शिवकांत पाटील कदम ,वाजेगाव सरपंच शेख जमील ,माजी पंचायत समिती सदस्य सुनिल पवार,माजी गटनेते विरेंद्रसिंह गाडीवाले, शेख चांद पाशा,चिमा पाटील, यन्नावार, राम सावरकर तुप्तेवार, रमेश पारसेवार , सिप्टा कंपनी चे मुख्य व्यवस्थापक लोणावत याच्यांसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी याची उपस्थिती होती. यावेळी मोदी टायर जवाहार नगर परिसरातील मोकळ्या जागेत सहभागी असलेल्या जवळपास हजारो कार्यकर्ते, सहभागी नागरिक तर सिप्टा कंपनीतील विविध भागात व्हि,आय.पी,व निमंत्रित पदाधिकारी, नेते, खासदार, आमदार यांच्या सह जवळपास पाच हजार जणांचा जेवणा संदर्भात पाहणी करून योग्य त्या सुचना दिल्या आहेत.
सिडको परिसरात कार्यकर्ते व पदाधिकारी यांना प्रशिक्षण शिबीर..
भारत जोडो यात्रे संदर्भात ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना साई दत मंगल कार्यालय येथे माजी मंत्री नसीम खान ,माजी मंत्री डि.पी.सावंत , काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांच्या सह प्रमुख पदाधिकारी यांच्या ऊपसिथीत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
भारत जोडो हि यात्रा नांदेड जिल्ह्यातील ६ नोव्हेंबर रोजी आगमन होत असुन ९ तारखेला दुपारी ही यात्रा नांदेड दक्षिण भागात येणार असुन मोदी टायर जवाहर नगर तुप्पा, मार्ग आगमन नांदेड शहरात होणार असुन या संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्रशिक्षण शिबीर मार्फत सुचना देण्यात आल्या. यावेळी अनिल मोरे, डॉ.रेखा चव्हाण, माजी नगरसेवक भानुसिंह रावत, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोहर पाटील शिंदे, गंगाप्रसाद काकडे, राहुल हंबर्डे, पंचायत समिती सदस्य श्रीनिवास मोरे, पंचायत समिती ऊप सभापती प्रतिनिधी फयुम भाई, माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे, माजी नगरसेविका सौ.ललीता शिंदे, डॉ.करूणा जमदाडे, गजानन देशमुख, डॉ.अशोक कलंत्री, सतिश बसवदे,वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कांचनगिरे,शेख अस्लम,राजु लांडगे, शेख चांद, दलीत मित्र नारायण कोंलबीकर, शंकरराव धिरडीकर, प्रेसनजित वाघमारे, देविदास कदम, संतोष कांचनगिरे,यांच्या सह ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.