उमरखेड/हिमायतनगर। विदर्भ- मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू असलेला वसंत सहकारी साखर कारखाना लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत सुरु होणार आहे.
दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामाचा शुभारंभ खासदार हेमंतभाऊ पाटिल, गोदावरी उद्योग समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटिल यांचे हस्ते यंत्र पुजन करून करण्यात आला.उमरखेड, महागांव, हदगांव, हिमायतनगर, आणि पुसद तालुक्यातील आणि एकूणच विदर्भ व मराठवाड्याच्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संपन्न होईल, कुशल व अर्थकुशल होतकरु तरुणाईच्या हाताला काम मिळणार आहे.
या भागातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने वसंत साखर कारखाना पुन्हा नव्याने कात टाकून सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक नवनवीन प्रकल्प यानिमित्ताने हाती घेतले जाणार आहेत. अनेक वर्ष बंद असलेला कारखाना यंदा सुरू होत असल्याने शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.
या कार्यक्रमाला लोकनेते मा बाबुरावजी कदम कोहळीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा, जि.प.स. चितांगराव कदम, पंजाबराव देशमुख साहेब, गोदावरी अर्बन बँकेचे संचालक अजयराव देशमुख सरसमकर, मुन्ना भाऊ देशमुख, भिमराव पाटील चंद्रवंशी, डॉ घोडेकर, डॉ खंदारे, भाऊराव पाटील, चव्हाण साहेब, सावंत साहेब, व्ही सी जाधव साहेब, संभाजी लांडगे साहेब, संतोषराव जाधव, सुदर्शन पाटील मनुलेकर, गंभीरे पाटील औंढा, धनंजय पाटील दातीकर, बाबुराव कदम रूई, ठाकरे सर, उमरखेड व हदगाव तालुक्यातील शेतकरी, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.