अगोदर अतिवृष्टी; आता भाव घसरल्याने बसला फटका
नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार| यंदा परतीच्या पावसात वरून राजाने झोडपून काढल्याने दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारात झंडुच्या फुलांची बरसात झाली आहे. अन्य जातींची फुले कमी तर झंडूच्या फुलांचा सुकाळ झाल्याने लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आले. मात्र झंडुच्या फुलांच्या विक्रीतून दिवाळी साजरी करण्याच्या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना फुलांचे भाव पडल्याने कवडीमोल दारात विक्री करावी लागली आहे. आवाज सकाळी ३० रुपयांपासून विक्रीला सुरुवात झाली, त्यानंतर भाव घसरत सायंकाळी १० रुपये किलोप्रमाणे विक्री करावी लागल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
सण - उत्सव , समारंभाचे वातावरण प्रसन्न करण्यासाठी फुलांची आवश्यकता असते. रुम फ्रेशनर, परफ्युम या कृत्रिम सुगंधांचा वापर केला तर जातोच, त्यामुळे ताज्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. बाजारपेठेत दिवाळीच्या पर्वावर झेंडूच्या फुलांचे ढीग लागलेले दिसतात. नांदेडच्या होलसेल व रिटेलर बाजारात दररोज सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी फुलांचे भाव बदलतात. तरीही ग्राहकांची फुलांना मोठी मागणी कायम असते. स्थानिक फुलांमध्ये झेंडू , गुलाब , मोगरा, शेवंती यांचा तर विदेशी फुलांमध्ये ऑर्किड, जरबेरा, कार्निशा, ग्लॅडुला, चायना रोझ, ग्रीन पिंक हाऊस शेवंती, व्हाईट ग्लॅडुला या बरोबरच आठ ते दहा अन्य फुलांचे प्रकार दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत दाखल झाले मात्र अति पावसामुळे संख्या कमी असल्याने फुले खरेदी करणे अनेकांच्या आवाक्याबाहेर होते.
व्यापारी, दुकानदार, मंदिरे, अपार्टंमेंटवर सुशोभिकरण करण्यासाठी झेंडू , गुलाबाच्या फुलांच्या हारांना मोठ्या प्रमाणावर मागणी करतात. यामुळे फुल विक्रेते ऑर्डरप्रमाणे हार बनवून देतात. दिवाळीच्या पर्व काळात कारागिर दिवसरात्र एक करुन हार तयार करीत असल्याचे दिसून आले आहे. मात्र या वर्षी परतीच्या पावसामुळे फुलांची आवक कमी झाली तर झंडूची फुले बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर परिसरात 10 ते 20 रुपये किलो दराने विक्री झाली आहे. सर्वच लोकांनी दिवाळीच्या दिवशी आपली प्रतिष्ठाने, वाहने, दुकान - घरांची दारे, फुले व आंब्याच्या पानानी सजविण्याची तयारी आजपासूनच सुरु केली.
दिवाळीचा मंगलपर्व सर्वत्र दिसुन आला असला तरी, अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अतिशय साध्या पद्धतीने व प्रदूषणमुक्त पटाख्याने साजरी होत असल्याचे पहावयास मिळात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झंडूच्या फुलाबरोबर पूजेला लागणाऱ्या उसालाही मागणी वाढली असून, 100 रुपयाला पाच नग ऊस, 50 रुपयाला पाच केळीचे कंद विकत घ्यावे लागल्याने महालक्ष्मीच्या पूजेला केळीच्या पानासह, उसालाही तेवढेच महत्व आले आहे.
एकूणच झंडूच्या फुलांचा सुकाळ, ऊस आणि केळीच्या कंदाचा दुष्काळ अशी परिस्थिती यंदा दिवाळीचं बाजारात दिसून आली आहे. त्यामुळे श्रीमंताच्या घरी फटक्याची धूम तर गरिबांना दिवाळी पुरणपोळीने आणि अतिवृष्टीने नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांना सध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याचे हिमायतनगर, भोकर, किनवट, माहूर, हदगाव, लोहा, देगलूर, बिलोली, नायगाव, धर्मबद, उमरीसह अनेक भागात दिसून आली आहे.