उस्माननगर। माणिक भिसे। येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दुपारच्या सत्रात " शिक्षकपूर्व अंतर्गत " नाविन्यपूर्ण आध्यपनशास्त्र दिदर्शन पाठ व त्यावरिल आंतरक्रिया या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास केद्र संकुलातील शिक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 'उस्माननगर, केंद्राचे केंद्रप्रमुख जयवंतराव काळे ,तर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी गट शिक्षणाधिकारी प.स.कंधारचे साधन व्यक्ती श्री.निवळे सर ,श्री. कोसंबे सर , चिखली केंद्राचे केंद्र प्रमूख व्ही.के. ढोणे , यांची प्रमुख उपस्थिती होती.
जि.प.के.प्रा. शाळा उस्माननगर येथील सहशिक्षक एकनाथ केंद्रे, यांनी सुंमधूर आगजात स्वागत गित सादर करून पाहूण्याचे स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षकपूर्व अंर्तगत पाठ दिग्दर्शन करण्यासाठी पहिली तासिका श्री रत्नाकर मोरे यांनी भाषा विषयीची इ. चौथी वर्गाची 'धरतीची आम्ही लेकरं " ही कविता चालीवर सुंदर गायन करून शैक्षणिक साहीत्याचा फुलोराचा वापर करून नाविन्यपूर्ण आसी घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद घेतला ,व बोधसुध्दा घेतला.
त्यानंतर दुसरी तासिका जि.प. के. प्रा.शाळा उस्माननगर येथील विद्यार्थी प्रिय आणि नाविण्यपूर्ण शिक्षक श्री केंद्र एकनाथ यांनी इ. पाचवी मधील गणित विषयातील (अपूर्णांक) या घटकावर, शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर वापर करुन विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात नाविण्यपूर्ण पाठाचे दिग्दर्शन केले. एकंदरी मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सदरील दिगदर्शन पाठावर केंद्रांतर्गत बऱ्याच शिक्षकांनी पाठवर आंतरक्रिया व प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प.स.कंधारचे नुतन गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे साहेबांनी भेट दिली असता केंद्राच्या वतिने सत्कार करण्यात आला .यावेळी शिराढोण केंद्राचे कें, प्र. जी .बालाजी कानशेटे उपस्थित होते "कार्यक्रमाचे सूत्रसंचाल . केंद्र ई. एस यांनी केले तर आभार प्रदर्शनश्री विश्वकर्मासर यांनी मानले.