जेष्ठ नेते दशरथराव लोहबंदे यांचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश -NNL

मराठवाड्यातील शोषीत वंचित अन्याय - अत्याचारग्रस्त पिडीतांच्या न्यायासाठी मदतीला धावणाऱ्या संघर्ष योद्धांच्या हाती भगवी मशाल 

दशरथराव लोहबंदे यांच्या शिवसेना प्रवेशाने तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलणार ..? 


मुखेड, रणजित जामखेडकर|
मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीतील दलित पॅंथरचे अग्रगण्य नेते तथा राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रदेश सरचिटणीस जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे यांनी शेकडो कार्यकर्तेसह मातोश्री येथे  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोहबंदे यांना  शिवबंधन बांधले असून दशरथराव लोहबंदे यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते, समर्थक शिवसेनेत दाखल झाले असल्याने मुखेडसह जिल्ह्यातील शिवसेना मजबूत होणार आहे.

लोहबंदे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचे शिवसैनिकांनी स्वागत केले असून शिवसेनेत आनंदाचे वातावरण पसरले आहे.दरम्यान यावेळी मुखेड - कंधार व देगलूर - बिलोली मतदार संघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त करुन उध्दव ठाकरे यांना तसे अभिवचन दिले. पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, शिवसेना उपनेत्या सुषमा ताई अंधारे, खा.अरविंद सावंत,नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, नागनाथ वाडीकर,बाळासाहेब कराळे, मुखेड तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे, बिलोलीचे तालुका प्रमुख विजय मुंडकर, देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील ,शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, बालाजी मैलागिरे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती. 

मराठवाड्यातील  दलित पॅंथर उभा करण्यात दशरथराव लोहबंदे यांचा सिंहाचा वाटा असून मराठवाडा नामांतर चळवळीत त्यांनी अनेक मोठमोठे आंदोलने करून नामांतर लढा यशस्वी करून दाखविला लोहबंदे यांनी त्यांच्या विद्यार्थीदशे पासून आंबेडकरी चळवळ सुरू करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ,आचार, तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले तसेच त्यांनी अनेक गावांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभा करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी मा.खा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून दलित ऐक्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर त्यांनी आपली स्वतंत्र चळवळ उभी करून तालुक्यातील गोरगरिबांना व वयोवृद्धांना, विधवा महिलांसाठी वेळोवेळी मोर्चे आंदोलने करून न्याय मिळवून देऊन हजारो निराधारांचा प्रश्न निकाली काढून त्यांनी गोरगरिबांना पेन्शन मिळून दिले. दरम्यान त्यांनी भीक मागणार्‍या व पाशी पारधी समाजातील गोरगरिबांना शहरालगत मोठी वस्ती उभा करून देऊन तिथे पक्के घरे पिण्याचे पाणी लाईटची व्यवस्था व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. 

त्यानंतर त्यांनी शहरात मध्यवस्तीत भव्य असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देखने स्मारक उभे केले. त्यानंतर फुलेनगर येथे भव्य असे भगवान गौतम बुद्धाची मूर्तीची स्थापना केली आहे. दशरथराव लोहबंदे हे जिल्ह्यातील अग्रगण्य राजकीय नेते म्हणून त्यांची वेगळी छाप आहे. ते पहिल्यांदा सतत विस वर्ष नगरसेवक, आता सलग दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य असून त्यांच्या कुटुंबात गत ४५ वर्षापासून नगरसेवक पद आहे. त्यांच्या सुनबाई मुखेड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष आहेत. तसेच ४५ वर्षापासून पांडुर्णी गावची सत्ता त्यांच्या कुटुंबाच्या हाती आहे. दरम्यान विद्यमान नगराध्यक्ष यांना निवडूण आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दशरथराव लोहबंदे हे भाजपाला व शिंदे गटाला रोखण्यासाठी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात चांगले कार्य केल्यामुळे व शिवसेनेचे ध्येय धोरणे चांगले असल्या कारणाने त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत ,बळकट करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्धार केला. 

त्यामुळे शुक्रवारी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली दशरथराव लोहबंदे यांनी मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला यावेळी उध्दव ठाकरे यांनी लोहबंदे यांना भगवी दस्ती घालून शिवबंधन बांधले लोहबंदे यांच्या समवेत,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी गडेवाड, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी ढोसणे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाअध्यक्ष पंडित ढवळे, चांंडोळाचे सरपंच साहेबराव सोनकांबळे, जुन्ना येथील माजी सरपंच बापुराव कांबळे,कौठा येथील मा. सरपंच व्यंकटराव घोरपडे, नगरसेवक राहुल लोहबंदे, रास्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस योगेश भगनुरकर,भाजपचे कार्यध्यक्ष गणेश डुबुकवाड,रास्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अजित पाटील, बहुजन समाज पार्टी चे अध्यक्ष पांडुरंग अडगुलवार,होलार समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ताळीकोटे, विनोद गजभारे , शंकर पिटलेवाड,सदाशिव चव्हाण, ओमप्रकाश चौधरी, यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

दशरथराव लोहबंदे हे शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असल्याने शिवसैनिकात नव चैतन्य निर्माण झाले असुन मुखेड तालुक्यात व जिल्ह्यात शिवसैनिकात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या पक्षप्रोशामुळे मुखेड व नांदेड जिल्हात शिवसेना मजबूत होणार आहे.दरम्यान यावेळी दशरथराव लोहबंदे यांनी मुखेड कंधार तसेच देगलूर - बिलोली विधान सभा मतदार संघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तसे अभिवचन देवुन साहेबांचे हात बळकट करून शिवसेनेसाठी तन मन धनानी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले होऊ घातलेल्या नगरपालिका ,जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत ही शिवसेनेचा झेंडा फडविणार असलल्याचे अभिवचन दिले. लोहबंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागली आहे..


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी