नांदेड| खुदा मै यह वतन चाहता हू l मेरी जान जाये वतन के लिये|
देशभक्ती, प्रेमविरह, प्रेमाची भावना, अभिवक्त करणाऱ्या एकापेक्षा एक सरस असा कव्वाली 'राष्ट्राचेतना-२०२२' आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात स्पर्धक कलावंतांनी सादर केला. लोकशाहीर वामनदादा कर्डक कला मंचावर सोमवारी रात्री उशिरापर्यंत कव्वाली हा गायन प्रकार सादर झाला. परभणी येथील शिवाजी लॉ कॉलेज च्या कव्वाली संघाने
'निगाहे मिलानेसे जी चाहता है l जलवा चुरानेसे को जी चाहता हू' l
ही भावस्पर्शी कव्वाली अपूर्वा गायकवाड, अंकिता केंद्रे, श्वेता कानंडखेडकर, वैभवी गाडेकर, शर्मिला उमरीकर या कलावंतांनी संगीताची साथ देत सादर केली.
खुदा मै यही वतन चाहता हू l यह धरती चमन चाहता हू l मेरी जान जाये वतन के लिये l
ही देशभक्ती जागृत करणारी भावना कव्वालीच्या सुरातून व्यक्त केली. ही कव्वाली प्रथमेश दळवी, मधूप्रिया गायकवाड, अभिषेक खोडवे यांनी गायली. नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातील मेघना पाठक, निशा घुले, अभिषेक काटे, तुषार वडणी या स्पर्धकांनी' हमने तुम्हे झुल्फोमे गीरफदार किया, ही हृदयस्पर्शी 'जुगलबंदी कव्वाली' सादर करत टाळ्या आणि शिट्यांची साद मिळवली.
'कसम यार है 'तेरी'l ही कव्वाली नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या अदिती केंद्रे, पूजा राहेगावक, मनीषा देशपांडे, अर्चना कंधारकर, अंकिता भोसले, स्वरदा लावेकर यांनी गायली. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीसर कॉलेजमधील आकांशा मोतेवार हिने गायलेल्या कव्वाली ला प्रतिसाद मिळाला. मंचावर विद्यार्थी विकास विभाग मंडळाचे संचालक डॉ.सूर्यप्रकाश जाधव,सल्लागार समितीचे डॉ. मा. मा. जाधव, डॉ. सुनील व्यवहारे, डॉ.कमलाकर चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर राऊत, डॉ.एम.आर.जाधव, डॉ.ज्ञानेश्वर चौधरी, डॉ.प्रल्हाद भोपे, डॉ.व्यंकटी पावडे, डॉ.यादव सूर्यवंशी, डॉ. रामदिनेवार आदी उपस्थित होते.