मुंबई| किरण पाटील यांचा आज भाजपात प्रवेश झाला . उद्या जेव्हा रणांगणात उतरतील तेव्हा मैदान मारूनच येतील असा दावा भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी केला .. आता किरण पाटील मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात ते फिरतील आणि शिक्षक नोंदणी करतील असं बावनकुळे म्हणाले . किरण पाटील एकदा आले की समोरच्याचा काय कार्यक्रम होणारय ते तुम्ही सगळ्यांनी ठरवलय ..किरण पाटील यांचा प्रवेश ठरला तेव्हा शेकडो फोन आले की कार्यकर्ता चांगला आहे.
विरोधी बाकावर मात्र त्यांनी आमच्याकडे आल्यामुळ चांगलाच गोंधळ उडाला होता याची आठवण देखील बावनकुळे यांनी करून दिली .. किरण पाटील यांचा प्रवेशानंतर शिक्षक आमदार निवडणूकीबाबत सुचक विधान बावनकुळे यांनी सूचक विधान केले. मराठवाड्यात कॅांग्रेसच्या शिक्षक संघटनेला मोठा धक्का बसणार असल्याचे ते म्हणाले . कॅांग्रेसचे किरण पाटील यांनी .. हजारो शिक्षकांसहीत कॅांग्रेस पक्षला सोडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज भाजपमध्ये प्रवेश केला .. किरण पाटील यांच्या प्रवेशानं भाजपची शिक्षक संघटणांमधील पकड वाढणार आहे .
मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासमोर भाजप किरण पाटील यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे .. कॅाग्रेस - राष्ट्रवादीचा गढ मानला जाणार्या शिक्षक आमदार मतदार संघावर भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे . मराठवाड्यातल्या शिक्षक संघटनांमध्ये किरण पाटील यांच्या माध्यमातून भाजपची जोरदार एन्ट्री झाल्याचे मानले जात आहे . राष्ट्रवादी आणि कॅांग्रेसचे मराठवाड्यातील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत . पक्ष प्रवेश अजून सुरु राहणार असल्याचे बावनकुळे म्हणाले ..
मराठवाड्यातील ८ ही जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेच्या सदस्य आणि पदाधिकारी यांचा भाजपात सामील आज झाला असा दावा त्यांनी केला ..तोला मोलाचा आणि प्रचंड ताकदीचा कार्यकर्ता भाजपला मिळाला. मराठवाड्यात अनेक दिवसात शिक्षक मतदार संघ जिंकलेला नाहीये.. त्यामुळं त्यांना आम्ही ही जबाबदारी दिलीय पुर्ण रणांगण त्यांना दिलय त्यामुळं त्यांनी आता कामाला लागण्याचे आदेश आम्ही दिलेत असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले : तुम्हाला मोहिमेवर पाठवत आहे त्यामुळं पुढच्याला चारही मुंड्या चीत करूनच या .. महाविकास आघाडीला उमेदवार भेटणार नाही अश्याच तयारीनं कामाला लागा असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले . सध्याच्या राजीकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले.